दाओस दौर्याची श्वेतपत्रिका काढणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री
विधान परिषद लक्षवेधी…
मुंबई, ३० जून (वार्ता.) – ‘गेल्या ३ वर्षांत दाओसला झालेले सामंजस्य करार आणि त्याची झालेली कार्यवाही, याची वस्तूस्थिती मांडणारी श्वेतपत्रिका काढण्यात येईल’, अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी २९ जून या दिवशी विधान परिषदेत लक्षवेधीला उत्तर देतांना केली. ‘शेंद्रा बिडकीन औद्योगिक पट्ट्यात जागतिक दर्जाच्या औद्योगिक सुविधा मिळत नाहीत’, असा प्रश्न विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केला होता. त्याला सामंत उत्तर देत होते.