वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाचा सातवा दिवस (३० जून) : उद्बोधन सत्र – हिंदुत्वनिष्ठांचे अनुभव
साम्यवाद्यांनी हिंदूंच्या इतिहासाचे विकृतीकरण करून नास्तिकतावाद पसरवला ! – कश्यप महर्षि. राज्य अध्यक्ष, धर्मवीर अध्यात्म चैतन्य वेदिका, तेलंगाणा
विद्याधिराज सभागृह – साम्यवाद्यांनी हिंदूंचा इतिहास पालटला. हिंदूंच्या गौरवशाली इतिहासाचे विकृतीकरण करून त्यांनी हिंदूंमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण केली आणि खोटा इतिहास त्यांच्यावर थोपवला. नास्तिकतावाद कर्करोगाप्रमाणे आहे. कथित विचारवंतांनी षड्यंत्र रचून हिंदूंच्या ग्रंथांचे विकृतीकरण केले आणि खोटा इतिहास लोकांसमोर मांडला. साम्यवाद्यांनी हिंदूंच्या इतिहासाचे विकृतीकरण करून समाजामध्ये नास्तिकतावाद पसरवला. नास्तिकतावाद पसरल्यामुळे समाजाची अधोगती झाली. कुटुंबव्यवस्था आणि आर्थिकव्यवस्था कोलमडली. विवाहव्यवस्थेवर परिणाम झाला, असे विधान तेलंगाणा येथील ‘धर्मवीर अध्यात्म चैतन्य वेदिका’ या संघटनेचे राज्य अध्यक्ष श्री. कश्यप महर्षि यांनी वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी केले.
ते पुढे म्हणाले की,
१. तेलंगाणा आणि आंध्रप्रदेश येथील हिंदूंना त्यांच्या खर्या इतिहासापासून दूर ठेवण्यात आले. आंध्रप्रदेशमध्ये पूर्वी प्रेलय रेवा रेड्डी नावाचा राजा होऊन गेला. त्यांनी वर्ष १३२० मध्ये भारतात सर्वप्रथम इस्लामच्या विरोधात ‘केरळ युद्धनीती’चा वापर केला. त्यांनी केरळमध्ये हिंदु शासनप्रणाली लागू केली. ते कट्टर हिंदु होते. त्यांच्या सैन्यदलात एकही मुसलमान नव्हता. आंध्रप्रदेशमधील एक संत पेदाकमोटी रेमा रेड्डी यांनी अद्वैत सिद्धांताचा प्रसार केला.
२. नास्तिकतेच्या विरोधात लढा देणे आणि लोकांमध्ये धर्माचे ज्ञान पोचवणे, या उद्देशाने ‘धर्मवीर अध्यात्म चैतन्य वेदिका’ कार्यरत आहे. विजय तपस्वी धर्मवीर यांच्या नेतृत्वाखाली धर्मरक्षणाचे काम चालू आहे. या संघटनेच्या वतीने धर्मवीर सिद्ध करून त्यांच्या माध्यमातून धर्मशिक्षण देण्याचे काम चालू आहे. इतिहास आणि धर्म यांच्या विकृतीकरणाचे षड्यंत्र उघड करणे, हिंदुविरोधी चित्रपटांच्या विरोधात लढा देणे, लहान मुलांना धर्मशिक्षण देण्यासाठी पालकांमध्ये जागृती निर्माण करणे. आदिवासी लोकांना त्यांच्या मूळ संस्कृतीविषयी जागृत करून त्यांचे धर्मांतर रोखणे, हिंदूंच्या घरांवर भगवा झेंडा फडकावून ‘धर्मांतर माफियां’ना दूर ठेवणे, अवैध मशिदी आणि चर्च हटवण्यासाठी सरकारला भाग पाडणे, इत्यादी कार्य ‘धर्मवीर अध्यात्म चैतन्य वेदिका’ या संघटनेच्या वतीने चालू आहे.
धर्मांधांच्या ‘इकोसिस्टीम’मध्ये असणार्या बिनसरकारी संस्थांचा निधी बंद केला पाहिजे ! – अधिवक्त्या (श्रीमती) सिद्ध विद्या, सर्वाेच्च न्यायालय, देहली आणि उच्च न्यायालय, मुंबई
काही राज्यांत जो ‘धर्मांतर विरोधी कायदा’ आणला आहेत, त्याला ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदे म्हटले जात आहे; परंतु ते तसे नाहीत. त्यात लव्ह जिहादची व्याख्या केलेली नाही, लव्ह जिहादशी संबंधित कित्येक गोष्टी त्यात नाहीत. धर्मांतरासाठी त्यात दंडाचे प्रावधान (तरतूद) आहे; परंतु लव्ह जिहादमधील कुठल्याही गुन्ह्यासाठी नाही. या कायद्याची इतर कुणाला अडचण नाही, केवळ मुसलमानांना आहे; कारण तेच धर्मांतर आणि लव्ह जिहाद करतात. लव्ह जिहाद करण्यार्या धर्मांधांची ‘इकोसिस्टीम’ (एकमेकांना साहाय्य करणारी साखळीव्यवस्था) समजून घेतली पाहिजे. त्यांच्या ‘एन्.जी.ओ.’कडून (बिनसरकारी संस्थांकडून) अशा फसवलेल्या मुलींचे घराबाहेर न पडण्यासाठी ‘तुम्हाला समाज स्वीकारणार नाही’, असे सांगितले जाते. या संस्थांविरोधात तक्रारी करून आणि त्यांना निधी कुठून येतो? ते पाहून तो बंद केला गेला पाहिजे. इथे अधिवक्त्यांची भूमिका महत्त्वाची आहे.
रस्त्यावर येऊन लढणार्या हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना फसवून त्यांच्या विरोधात गुन्हे नोंद होतात. नौखालीतील लोक त्यांच्या मागील पिढीवर झालेले अत्याचार आज पूर्णतः विसरले आहेत. सामाजिक माध्यमांवरून आज हिंदूंनी त्यांची सामुग्री (‘कंटेंट’) मोठ्या प्रमाणात पसरवणे आवश्यक आहे. अधिवक्त्यांना कायदा ठाऊक असल्यामुळे त्याप्रमाणे ते लिखाण ते करू शकतात.
👨🏻🎓 Advocates should start writing more of pro-Hindu content on social media to counter the fake narratives as they can write within the framework of Law – Adv. Siddha Vidya, Supreme Court
Vaishvik Hindu Rashtra Mahotsav
The only solution to all problems of Hindus – Love… pic.twitter.com/krWlVElSMF
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 30, 2024
‘ऑनलाईन’ बकरी कापण्याची अनुमती बंद करणे भाग पाडले !
श्रीमती सिद्धी विद्या पुढे म्हणाल्या की, लव्ह जिहादच्या प्रकरणात मुलीला चोरी करायला लावली. पहिल्या दिवसापासून हे प्रेम नव्हते, तर ओळख लपवून फसवले गेले अशा सार्या गोष्टी एफ्.आय.आर्.मध्ये नोंद व्हायला हव्यात. ओळख लपवून करत असलेला खोटेपणा पुढे यायला हवा. यात खात्री आणि पुरावे असले पाहिजेत, आरोपपत्र प्रविष्ट झाले पाहिजे. ‘बकरी कापायला ऑनलाईन अनुमती दिल्यामुळे काय अडचणी येतात ?’, हे न्यायालय समजूच शकत नव्हते. ही अनुमती मिळाल्याने एखाद्याच्या दारात बकरी कापली जाणार असेल, तर त्याला काय त्रास होऊ शकतो ?, हे कळण्यासाठी आम्ही मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती ओक यांच्या न्यायालयात बकरी कापण्याची अनुमती घेतली आणि त्यांना कागद दाखवले, तेव्हा त्यांना त्याचे गांभीर्य लक्षात आले. त्याच दिवशी दुपारी त्यांनी ऑनलाईन बकरी कापण्याची अनुमती बंद केली. त्यामुळे अधिवक्त्यांनी प्रसंगी निराळ्या पद्धतीनेही काम केले पाहिजे.
श्रीमती सिद्धी विद्या यांनी धर्मांतराची सांगितलेली काही उदाहरणे !
१. एका हिंदु मुलीची एक मुसलमान मैत्रीण होती. हिंदु मुलगी बसस्थानकावर उभी असतांना एकाने तिला छेडछेडीपासून वाचवले आणि नंतर प्रेमाच्या जाळ्यात फसवून निकाह केला. त्यापूर्वी तिला घरी चोरी करायला लावली. नंतर तिला कळले की, तो मुसलमान आहे. त्यानंतरही ती बाहेर पडू शकली नाही; कारण त्यांच्या ‘एन्.जी.ओ.’कडून (बिनसरकारी संस्था) त्यांना तक्रार न करण्याविषयी प्रबोधन केले जात होते.
२. नौखालीत मुसलमानांकडून हिंदूंवर प्रचंड अत्याचार झाले, तेव्हा त्यांनी हिंदु अधिवक्ते न्यायाधीश यांच्या घरातील बायकांना घराबाहेर आणून त्यांच्यावर अत्याचार केले. त्यांच्या घरातील बहिणींना बाहेर जावे लागू नये; म्हणून येथील मुसलमान झालेल्या हिंदूंनी नाईलाजाने बहिणींशी लग्न केले. प्रत्येक घरात प्रतिदिन पोलीस निरीक्षक येऊन ५ वेळा नमाज होतो कि नाही ? हे पहात असे. आता ३ पिढ्यांनंतर येथील लोकांना ‘आपण मुसलमान का झालो ?’ याविषयी काहीच वाटत नाही.
मंदिरांच्या सहस्रो एकर भूमीवर अतिक्रमण ! – अनुप जयस्वाल, सचिव, देवस्थान सेवा समिती, विदर्भ, महाराष्ट्र
मंदिरांच्या भूमीवरील अतिक्रमण हटवण्यासंदर्भातील अनेक खटले न्यायालयात चालू आहेत. या मंदिरांना त्यांची भूमी मिळवून देण्यासाठी ‘देवस्थान समिती विदर्भ’ स्थापन करण्यात आली. या समितीच्या अंतर्गत आजपर्यंत १ सहस्र ५०० एकर भूमी मंदिरांना परत करण्यात यश मिळाले. काही स्वार्थी लोकांमुळे मंदिरांच्या भूमीवर सतत अतिक्रमण होत आहे. त्यामुळे मंदिर विश्वस्तांनी सतर्क रहाणे आवश्यक आहे, तसेच मोठ्या मंदिरांनी लहान मंदिरांना साहाय्य केले, तर आपण सहजपणे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेकडे अग्रेसर होऊ शकतो, असे प्रतिपादन ‘देवस्थान सेवा समिती, विदर्भ’चे सचिव आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य ‘कोअर कमिटी’ सदस्य श्री. अनुप जयस्वाल यांनी केले.
ते पुढे म्हणाले, ‘‘मंदिरांचा निर्वाह चालवण्यासाठी राजे-महाराजे आणि श्रीमंत लोकांनी मंदिरांना भूमी अर्पण केली होती. त्या भूमीवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करण्यात आले आहे. मंदिरांच्या भूमी भाडेतत्वावर देण्यात आल्या होत्या. इंदिरा गांधी यांनी ‘सिलिंग’चा कायदा लावला, तेव्हा ‘मंदिराच्या भूमींचे भाडे द्यायचे नाही’, असा अपप्रचार करण्यात आला. तेव्हापासून त्या भूमींचे भाडे देणे बंद झाले. आता मंदिरांची सहस्रो एकर भूमी अवैधपणे भाडेकरूंना हस्तांतरित करण्यात आली आहे. मंदिरांच्या अशा विविध समस्या सोडवण्यासाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची स्थापना करण्यात आली आहे. या महासंघाकडून २ राज्यस्तरीय आणि १० जिल्हास्तरीय अधिवेशने घेण्यात आली. या अधिवेशनांना मंदिर विश्वस्तांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अमरावती येथील अधिवेशनाला ६५० हून अधिक विश्वस्त होते.’’