‘फॅशन शो’ आणि सौंदर्यप्रसाधने यांद्वारे होणार्या हिंदु महिलांच्या फसवणुकीच्या विरोधात आवाज उठवला ! – साध्वी आत्मनिष्ठा, जबलपूर, मध्यप्रदेश
वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाचा सातवा दिवस (३० जून)
रामनाथी, गोवा : सध्या अनेक ठिकाणी ‘फॅशन शो’ आयोजित करणारे मुसलमान असतात. तेथे ‘रँम्प’वर चालणार्या युवती मात्र हिंदु असतात. या ‘फॅशन शो’चे ‘व्हिडिओ’ इस्लामी देशांमध्ये पाठवले जाते. याद्वारे ‘रॅकेट’चालवून महिलांचे मोठ्या प्रमाणात शोषण केले जाते. अशा प्रकारचे आयोजन करणारे ‘माफिया’ मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. भारतातील अनेक सौंदर्यप्रसाधने विदेशी आस्थापनांच्या कह्यात आहेत. सौंदर्यप्रसाधनांच्या माध्यमातूनही हिंदु महिलांना फसवण्याचे नियोजित षड्यंत्र चालू आहे. हे लक्षात आल्यावर ‘फॅशन शो’ आणि सौंदर्यप्रसाधनालये यांच्या माध्यमातून हिंदु महिलांची जिहाद्यांकडून होणारी फसवणूक रोखण्यासाठी आम्ही आवाज उठवला. हिंदु महिलांची फसवणूक होत असलेले किमान ५० कार्यक्रम आम्ही बंद पाडले.
हिंदु महिला भारतीय संस्कृतीकडे वळण्यासाठी आम्ही त्यांच्या एकत्रिकरणासाठी हळदी-कुंकूसारखे कार्यक्रम चालू केले. या माध्यमातून आम्ही त्यांना चाकरी, तसेच अन्य मार्गांचे प्रशिक्षण दिले. या युवती-महिलांना आम्ही स्वरक्षण करणारे प्रशिक्षण देतो. यात लाठी-काठी, तलवार चालवणेही आम्ही शिकवतो.