धर्मांधाविरुद्ध कठोर कारवाई करा ! – सकल हिंदु समाज
|
ठाणे – एका महिलेचा पाठलाग करत तिच्या घरात घुसून तिचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी शहजाद शेख या धर्मांधाविरुद्ध कठोर कारवाई करा, अशी मागणी हिंदु संघटना आणि भाजपचे पदाधिकारी यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी लक्ष घालण्याची मागणीही हिंदु संघटनांनी केली आहे.
Incident of molestation of a woman by fanatics in the Hajuri area of Thane
Take strict action against fanatics! – Sakal Hindu Samaj
Memorandum to the Police Commissioner!
A mob of 100 to 150 Mu$l!ms enter a temple wearing shoes !
Pressure on the police by fanatics and… pic.twitter.com/11eGLr7szI
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 30, 2024
‘येथील हाजुरी भागात विशिष्ट समाजाकडून धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने कारस्थाने चालू आहेत. कायद्याचे भय नसलेल्या समाजाकडून मंदिरांचीही विटंबना केली जात आहे. जिहादी उन्माद करणार्यांवर कठोर कारवाई करावी’, असा आरोपही सकल हिंदु समाजाने केला आहे.
१. २३ जून या दिवशी शहजाद शेख हा सुट्टे पैसे मागण्याच्या बहाण्याने दिवसाढवळ्या हिंदु महिलेच्या घरात घुसला आणि तिचा विनयभंग केला. स्वतःला वाचवण्यासाठी पीडित महिलेने परिसरातील शिवमंदिरात आश्रय घेतला.
२. तेव्हा १०० ते १५० मुसलमान मंदिर परिसरात घुसले आणि पीडित महिलेला बाहेर येण्यास सांगितले. तिने बाहेर येण्यास नकार दिल्यावर सर्व जण चप्पल-बूट घालून मंदिरात घुसले आणि त्यांनी मंदिराची विटंबना करत धमक्या दिल्या.
३. या घटनेमुळे हिंदूंच्या मंदिराचे पावित्र्य भंग झाले असून धार्मिक तणाव निर्माण झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या प्रकारामुळे हिंदु समाजात असुरक्षितता आणि रोष निर्माण झाला आहे.
४. धर्मांधांनी आरोपीला वाचवण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला होता. स्थानिक राजकीय पदाधिकार्यांनीही पोलिसांवर दबाव आणला होता. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली; पण आरोपीची तात्काळ जामिनावर मुक्तता झाल्याने हिंदु समाज आक्रमक झाला आहे.
५. पोलिसांनी दोषींविरुद्ध गुन्हा नोंदवावा, तसेच अन्य जिहादी नेत्यांविरुद्ध कारवाई करावी. भविष्यात अशा घटनांना प्रतिबंध करण्यासाठी कठोर पावले उचलावीत. याविषयी जर तात्काळ कार्यवाही झाली नाही, तर तीव्र आंदोलन करण्याची चेतावणी सकल हिंदु समाजाचे विजय त्रिपाठी यांनी दिली आहे.
६. ‘आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, याकरता सकल हिंदु समाज, तसेच भारतीय स्त्रीशक्ती, राष्ट्रसेविका समिती, हिंदु जागरण मंच, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, दुर्गा वाहिनी, शिव शंभू विचार मंच आदी संघटनांनी २९ जूनला ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
हाजुरी येथील हिंदू असुरक्षित !या वेळी ठाणे पोलीस आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात ‘हाजुरी येथील हिंदु रहिवासी अत्यंत असुरक्षित आहेत. अनेक महिन्यांपासून हिंदूंवर अत्याचार करून त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत’, असे म्हटले आहे. |
संपादकीय भूमिका
|