शुद्ध प्रसाद मिळण्यासाठी देशभरातील मंदिर परिसरातील हिंदु दुकानदारांनी ‘ओम प्रमाणपत्र’ घ्यावे ! – टी. राजासिंह, आमदार, तेलंगणा
‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या सहाव्या दिवशी पत्रकार परिषद !
पणजी – आजकाल ‘थुंकी जिहाद’, गायीच्या चरबीपासून बनवलेले पदार्थ, तसेच खवा, पेढा आदी प्रसाद म्हणून सर्रासपणे वितरित केले जात आहे. भाविक भक्तीभावाने देवाला प्रसाद अर्पण करतात. त्यामुळे प्रसादातील ही अशुद्धता, हा एकप्रकारे हिंदूंच्या धार्मिक श्रद्धेवर आघात आहे. आज अनेक तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अहिंदु दुकानदारांची प्रसाद आणि पूजासाहित्य यांची दुकाने असतात. ‘त्यांच्याकडील प्रसाद आणि साहित्य शुद्ध अन् पवित्र असेलच’, असे सांगता येत नाही. बाहेरगावाहून आलेल्या भाविकांना शुद्ध प्रसाद कुठे मिळतो ?, हे माहिती नसते. त्यामुळे सध्या केवळ हिंदु दुकानदारांना प्रसादशुद्धीसाठी ‘ओम प्रमाणपत्र’ वितरित करण्याचा उपक्रम चालू करण्यात आला आहे.
Hindu shopkeepers across the country should get the ‘Om Certificate’ to access pure Prasad : @TigerRajaSingh
Press Conference – Vaishvik Hindu Rashtra Mahotsav
Read More :https://t.co/N9H5PnWJcF
🚫 Today, the sites of our Holy temples and places of pilgrimage are replete… pic.twitter.com/jhHEUaX5AS
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 29, 2024
हिंदु दुकानदारांना ‘ओम प्रमाणपत्र’ विनामूल्य दिले जाणार आहे. देशभरातील मंदिर परिसरातील हिंदु दुकानदारांनी ‘ओम प्रमाणपत्र’ अवश्य घ्यावे, असे आवाहन तेलंगणा येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार श्री. टी. राजासिंह यांनी केले. ते गोवा येथील ‘वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या निमित्ताने पणजी येथील ‘झेट स्क्वेर बॅक्वेट हॉल’ येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक –
या वेळी ‘काशी येथील ज्ञानवापी, मथुरा येथील श्रीकृष्णभूमी’ आदी प्रमुख हिंदु मंदिरांचा खटला लढवणारे सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन, ‘हिंदु जनजागृती समिती’चे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे आणि ‘गोमंतक मंदिर महासंघा’चे राज्य सचिव श्री. जयेश थळी उपस्थित होते.
मंदिरांत हलाल प्रमाणित पदार्थ विकले जाणे, हे हिंदूंच्या धार्मिक अधिकारांवर अतिक्रमण ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
या वेळी श्री. रमेश शिंदे म्हणाले की, मुसलमानांच्या आग्रहामुळे देशात ‘हलाल सर्टिफिकेट’ घेणे सर्वच उत्पादनांना बंधनकारक केले जात आहे. हिंदूंनाही हलाल प्रमाणित उत्पादने घ्यावी लागत आहेत. तामिळनाडूतील मंदिरांत हलाल प्रमाणित पदार्थ विकले जात होते. हिंदूंच्या धार्मिक अधिकारांवर हे अतिक्रमण आहे. देवाला अर्पण करण्यात येणारा प्रसाद हा शुद्ध आणि सात्त्विक असला पाहिजे. धर्माचरण करणार्या हिंदूंचा हा अधिकार आहे. हिंदूंना शुद्ध आणि चांगल्या दर्जाचा प्रसाद मिळण्यासाठी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष श्री. रणजीत सावरकर यांच्या ‘ओम प्रतिष्ठान’च्या वतीने ‘ओम प्रमाणपत्र (सर्टिफिकेट) देणे चालू करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर येथील मंदिर परिसरातील १०० प्रसाद विक्रेत्या हिंदूंना ‘ओम सर्टिफिकेट’ देण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र देशभरातील मंदिर परिसरातील दुकानदारांनाही देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
भारत सरकारची भूमी वक्फला देणे, हे अवैध असल्याने वक्फ बोर्ड बरखास्त करा ! – अधिवक्ता विष्णु जैन, सर्वोच्च न्यायालय
देशाचे विभाजन झाल्यावर भारतातील अनेक मुसलमान त्यांची सहस्रो एकर भूमी आणि संपत्ती सोडून पाकिस्तानात गेले. त्यांची ही संपत्ती ‘इव्हॅक्यु प्रॉपर्टी अॅक्ट, १९५०’ नुसार केंद्र सरकारने स्वत:च्या कह्यात घ्यायला हवी होती; मात्र तत्कालीन काँग्रेस सरकारने ही सर्व संपत्ती वक्फ बोर्डाला देऊन त्याचा ‘वक्फ बोर्ड’ बनवला. त्यामुळे त्यांची ही कृती पूर्णपणे अवैध आहे. खरे तर ती भूमी पाकिस्तानातून स्वत:ची संपत्ती सोडून आलेल्या हिंदूंना देण्याची आवश्यकता होती; मात्र आता वक्फ बोर्ड सदर भूमी सरकार आणि खासगी संस्था यांना भाडे करारावर देऊन कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळवत आहे. हे चुकीचे आहे. सरकारची जागा घेऊन त्याच जागेसाठी सरकारकडून भाडे घेणे, हे अवैध आहे. त्यामुळे वक्फ बोर्ड बरखास्त केले पाहिजे.
गोव्यातील मंदिरांच्या परिसरातील हिंदु दुकानदारांना ‘ओम सर्टिफिकेट’ घेण्याविषयी सांगणार ! – श्री. जयेश थळी, राज्य सचिव, गोमंतक मंदिर महासंघ
आम्ही मंदिर महासंघाच्या वतीने गोव्यातील मंदिरांच्या जत्रोत्सवात ‘फास्टफूड’ आणि प्लास्टिक पिशव्या यांविरोधात मोहीम राबवली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. आता आम्ही गोव्यातील सर्व मंदिरांच्या परिसरातील हिंदु दुकानदारांना ‘ओम सर्टिफिकेट’ घेण्याविषयी सांगणार आहोत, जेणेकरून भाविकांना शुद्ध आणि सात्त्विक प्रसाद मिळेल.
हे ही वाचा –
ॐ प्रमाणपत्राच्या माध्यमातून हलाल प्रमाणपत्राच्या इस्लामी अर्थव्यवस्थेला रोखा ! – नरेंद्र सुर्वे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती, देहली
https://sanatanprabhat.org/marathi/808335.html