Amarnath Yatra 2024 : पहिल्या दिवशी ४ सहस्र ६०३ भाविकांनी घेतले शिवलिंगाचे दर्शन !
अमरनाथ यात्रेला आरंभ
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील अमरनाथ यात्रेत पवित्र गुहेतील बाबा बर्फानी या बर्फापासून नैसर्गिकरित्या निर्माण होणार्या शिवलिंगाचे दर्शन घेण्यास २९ जूनपासून आरंभ झाला. बालताल आणि पहलगाम या यात्रा तळांवरून यात्रेकरूंचा पहिला गट पहाटे अमरनाथ गुहेकडे मार्गस्थ झाला. पहिल्या दिवशी एकूण ४ सहस्र ६०३ भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले. अमरनाथ यात्रा ५२ दिवस चालणार आहे. ही यात्रा १९ ऑगस्ट या दिवशी संपणार आहे. यावर्षी अमरनाथ यात्रेसाठी ३ लाख ५० सहस्रांहून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे.