मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार ! – रवींद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री
मुंबई – मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचा ‘पनवेल ते इंदापूर’पर्यंतचा भाग भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्या अखत्यारित आहे. ‘पनवेल ते कासू’पर्यंतच्या भागातील महामार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. सेवा रस्ते आणि गडब गावातील भुयारी मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. ‘कासू ते इंदापूर’पर्यंतच्या भागातील महामार्गाचे ७२ टक्के काम पूर्ण झाले असून भुयारी मार्ग, उड्डाणपुलांचे काम प्रगतीपथावर आहे. महामार्गाच्या ‘इंदापूर ते झाराप’पर्यंतच्या भागाचे ८५ टक्के काम पूर्ण झालेले असून उर्वरित काम प्रगतीपथावर आहे. महामार्गाची सर्व कामे डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होतील, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी २८ जून या दिवशी विधान परिषदेत सांगितले. यासंदर्भात आमदार विक्रम काळे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देतांना मंत्री चव्हाण बोलत होते.