नागपूर येथे ४०० शिक्षकांची बोगस नियुक्ती
नागपूर – येथे ४०० शिक्षकांची बोगस नियुक्ती करण्यात आली आहे. मृत सेवानिवृत्त शिक्षण अधिकार्यांच्या खोट्या स्वाक्षर्या आणि शिक्के यांचा वापर करून या नियुक्त्या करण्यात आल्या. मृत माजी शिक्षणाधिकारी सोमेश्वर नैताम यांचीही यात स्वाक्षरी आहे. या काळातील आवक-जावक नोंदवही गहाळ आहे. त्याचा शोध चालू आहे. रजिस्टर शोध सध्या घेतला जात आहे.
संपादकीय भूमिकाइतक्या मोठ्या प्रमाणात बोगस नियुक्त्या होऊन शिक्षण विभागाला त्याचा थांगपत्ता कसा लागत नाही ? |