हिंदु धर्म केवळ हिंदु समाजासाठीच नाही, तर संपूर्ण मानवतेसाठी समान ! – जगद्गुरु पूज्य श्री शंकरा विजयेंद्र सरस्वती शंकराचार्य स्वामी, पीठाधिपती, श्री कांची कामकोटी पीठ
‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या निमित्ताने संत संदेश !
प्राचीन काळी सर्वत्र प्रचलित असलेला आणि वेदांवर आधारित असलेला सनातन धर्म आपल्या भारत देशामध्ये कलियुगातही चालू आहे. या धर्माने अनेक अडथळ्यांवर मात केली असून हा धर्म केवळ हिंदु समाजासाठीच नाही, तर संपूर्ण मानवतेसाठी समान आहे आणि कुणावरही लादल्याविना आपल्या राष्ट्रात त्याचे पालन केले जात आहे. अशा पवित्र ठिकाणी २४ जूनपासून ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ चालू झाला आहे. हिंदु जनजागृती समितीकडून पाठवण्यात आलेले हे निमंत्रण श्री आदिशंकर भगवतपाद मूलम न्याय सर्वज्ञपीठम् श्री कांची कामकोटी पीठाधिपती जगद्गुरु पूज्य श्री शंकरा विजयेंद्र सरस्वती शंकराचार्य स्वामी यांच्यासमोर सादर करण्यात आले. ते ऐकून स्वामीजींना अतिशय आनंद झाला आणि त्यांनी श्री महात्रिपुरसुंदरी समवेत श्री चंद्रमौलीश्वर स्वामी यांना ‘आशीर्वाद द्यावा’, अशी प्रार्थना केली.
– व्यवस्थापक, श्रीमठम् संस्थानम्, श्री कांची कामकोटी पीठम्.