रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय
१. श्री. दिनेश कुमार चौधरी, प्रदेश अध्यक्ष, अखिल भारतीय सीरवी समाज, ठाणे, महाराष्ट्र.
अ. ‘आश्रमामध्ये गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी अधिक चांगले कार्य चालू आहे.
आ. सनातन धर्माच्या रक्षणार्थ आपल्याकडून होत असलेले ईश्वरी कार्य कौतुकास्पद आहे.’
२. श्री. रामचंद्र केवट, सचिव, हिंदु जागरण मंच, नकोडा, घुग्घुस, चंद्रपूर.
अ. ‘अद्भुत ! मी हिंदु असल्याचा मला गर्व आहे आणि गुरुदेव धर्मजागृतीसाठी जे कार्य करत आहेत, त्यासाठी मी कृतज्ञता व्यक्त करतो.
आ. माझी भगवंताच्या चरणी प्रार्थना आहे, ‘सर्व सनातनी हिंदूंनी एकत्र होऊन गुरुदेवांचा आशीर्वाद प्राप्त करून संघटित व्हावे आणि येथे चाललेले संशोधन समजून घ्यावे.’
३. श्री. मुकेश सोनवणे, धुळे, महाराष्ट्र.
अ. ‘आश्रम पाहून प्रसन्नता वाटली.
आ. संपूर्ण आश्रमात सात्त्विकता जाणवली.’
४. श्री. अनंत विजय, संपादक, दैनिक जागरण, गाझियाबाद, उत्तरप्रदेश.
अ. ‘एक अशी अनुभूती आली की, जी शब्दांमध्ये वर्णन करणे कठीण आहे !
आ. आध्यात्मिक वातावरणात मनाला अनंत शांती लाभली.’
५. डॉ. कर्मवीर सिंह गौर, सदस्य, हिंद रक्षक, इंदूर, मध्यप्रदेश.
अ. अपूर्व ! येथील व्यवस्थापन, स्वच्छता, सेवाभाव आणि एवढे साधक एकत्र राहून जी निरपेक्ष सेवा करत आहेत, ते पुष्कळच स्फूर्तीदायक आहे.
(सर्व सूत्रांचा दिनांक : २४.६.२०२४)
सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून मान्यवरांनी दिलेले अभिप्राय
१. श्री. रामचंद्र केवट (सचिव,हिंदु जागरण मंच), नकोडा, घुग्घुस, चंद्रपूर.
अ. ‘अतिशय उत्तम आणि अप्रतिम ! जिज्ञासू व्यक्ती जागृत होतील.
आ. सर्वांनी जगाचे हे नियमन समजून घेतले पाहिजे !’
(सर्व सूत्रांचा दिनांक : २४.६.२०२४)
२. श्री. मुकेश सोनवणे, धुळे, महाराष्ट्र.
अ. ‘असेही असू शकते, याचे आश्चर्य वाटले.
आ. कधी अशा प्रकारचे प्रदर्शन आम्हाला पहायला मिळाले नव्हते.’
(२४.६.२०२४)
|