अश्लीलता पसरवून समाजावर आघात करणार्यांवर बलात्काराचा गुन्हा नोंदवायला हवा ! – उदय माहुरकर, संस्थापक, सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाऊंडेशन, देहली
वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशनाचा चौथा दिवस (२७ जून) उद़्बोधन सत्र – ओटीटी आणि हिंदी चित्रपटसृष्टी
विद्याधिराज सभागृह – भावाने बहिणीवर बलात्कार केला, शिक्षकाने विद्यार्थीनींवर बलात्कार गेला, वडिलांनी मुलीवर बलात्कार केला, अशा घटना समाज घडत आहेत. संस्कृतीवरील या आक्रमणाच्या विरोधात मागील २० वर्षांपासून आम्ही काम करत आहोत. वर्ष २०२० मध्ये ‘ओटीटी प्लॅटफॉर्म्स’ आल्यावर व्यभिचाराच्या सर्व मर्यादा ओलांडण्यात आल्या आहेत. ‘अल्ट बालाजी’ या ओटीटी प्लॅटफार्मवर पुरुषाचे आजी, सावत्र आई, सून यांच्याशी व्यभिचार असल्याचे दाखवण्यात येत आहे. पुरुषाचे सासूसमवेत, वहिनीसमवेत, मोलकरीण, शेजारीण यांसमेत व्यभिचाराचे चित्रण दाखवले जात आहे. भारतावर आक्रमण करणार्यांनी जेवढी देशाची हानी केली नाही, तेवढी हानी ‘ओटीटी प्लॅटफॉर्म्स’वरील व्यभिचारी व्हिडिओंच्या माध्यमातून झाली आहे. ८० टक्के बलात्कार अशा प्रकारचे व्हिडिओ पाहून होत आहेत. समाजाला तोडण्याचे हे षड्यंत्र आहे. असा व्यभिचार दाखवणार्यांची जागा कारागृहात असायला हवी. हे रोखण्यासाठी आम्ही योजना निश्चित करत आहोत. अश्लीलता पसरवून समाजावर आघात करणार्यांवर बलात्काराचा गुन्हा नोंदवायला हवा. अशांना ३ वर्षांपर्यंत जामीन मिळू नये. संस्कृतीवरील हे आक्रमण राष्ट्रद्रोह मानला जावा, असा कडक कायदा या विरोधात असणे अपेक्षित आहे. आम्ही केलेल्या तक्रारीनंतर ५७ ओटीटी प्लॅटफॉर्म्स आणि अन्य सामाजिक माध्यमे यांवर बंदी घालण्यात आली आहे. हा व्यभिचार रोखण्यासाठी सरकारने जी जागृती दाखवायला हवी, ती दाखवली नाही, ही वस्तूस्थिती आहे; मात्र भविष्यात हे रोखण्यासाठी ठोस पावले उचलली जातील. हे केवळ सरकारचे काम नाही, तर या सांस्कृतिक आघाताविषयी समाजानेही जागृत असायला हवे, असे वक्तव्य सेवा कल्चर सेवा भारत फाऊंडेशनचे संस्थापक श्री. उदय माहुरकर यांनी केले. ते ‘ओटीटी प्लॅटफॉम्सद्वारे पसरवण्यात येणारी अश्लीलता आणि त्याच्या विरोधात चालू करण्यात आलेली सेव्ह केल्चर, सेव्ह नेशन मुव्हमेंट’ या विषयावर बोलत होते.
The #OTT platforms are doing more harm to Hindu culture and the nation than the damage inflicted by invaders – @UdayMahurkar (Former Central RTI Commissioner) on #Intellectual_Terrorism at Vaishvik Hindu Rashtra Mahotsav
🎥🎞️🎬 OTT is openly serving porn content
✊ It's the… pic.twitter.com/QUVlYMcMkB
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 27, 2024
भारताला ‘विकृत सामुग्रीमुक्त’ करण्यासाठी प्रतिज्ञा करायला हवी !श्री. माहुरकर पुढे म्हणाले की, ‘नेटफिक्स आणि ‘एक्स’ द्वारे ‘पोर्नोग्राफी’चे उदात्तीरकण चालू आहे. यावरून अत्यंत व्यभिचारी व्हिडिओ प्रसारित केले जात आहेत. ‘पोर्नोग्राफी’वर बंधी घालण्याची मागणी आम्ही केंद्रशासनाकडे केली आहे. केंद्र सरकारने मागील १० वर्षांत विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. काही इस्लामी देशांमध्ये ‘पोर्नोग्राफी’वर बंदी घालण्यात आली आहे. भारतालाही ‘विकृत सामग्रीमुक्त’ करण्यासाठी आपण प्रतिज्ञा करायला हवी. |
संस्कृतीरक्षणाचे कार्य करणारी हिंदु जनजागृती समिती जगातील सर्वांत सात्त्विक संघटना !संस्कृतीच्या रक्षणासाठी कार्य करणारी हिंदु जनजागृती समिती विश्वातील सर्वांत सात्त्विक संघटना आहे. या संघटनेमध्ये काम करणारी एकही व्यक्ती संधीसाधू नाही, असे गौरवोद़्गार श्री. उदय माहुरकर यांनी काढले. सनातन संस्था संस्कृती रक्षणाचे कार्य करत आहे !सनातन संस्था कोणते आतंकवादी कारवाया करणारी संस्था नाही, तर संस्कृतीचे रक्षण करणारी संस्था आहे. बंदी घालायची असेल, तर देवबंद, तबलिगी जमात यांवर बंदी आणावी, असे वक्तव्य श्री. उदय माहुरकर यांनी केले. |