तीव्र तळमळीने गुर्वाज्ञापालन करणारे पुणे येथील ६७ टक्के पातळीचे श्री. माधव इनामदार (वय ८५ वर्षे) आणि ६९ टक्के पातळीच्या सौ. माधुरी माधव इनामदार (वय ७९ वर्षे) !
‘काही वर्षांपूर्वी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘सर्व साधकांनी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेअंतर्गत प्रतिदिन १५ स्वयंसूचना सत्रे करावीत’, अशा आशयाची चौकट प्रसिद्ध झाली होती. तेव्हापासून इनामदार काका-काकू यांनी त्यासाठी प्रयत्न चालू केले. एकदा काकांनी काकूंना मध्यरात्री २ वाजता उठवले आणि सांगितले, ‘‘आपले १५ वे सत्र करायचे राहिले आहे.’’ तेव्हा काकू लगेच उठल्या आणि दोघांनी मिळून सत्र केले. या प्रसंगातून ‘गुर्वाज्ञापालनाची तीव्र तळमळ कशी असते !’, हे मला शिकायला मिळाले.
‘हे गुरुमाऊली, अशी तळमळ आम्हा सर्व साधकांमध्ये निर्माण होऊ दे’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’
– कु. सुप्रिया सतीश जठार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.६.२०२४)