साधकांवर स्थुलातून आणि सूक्ष्मातूनही प्रीतीचा वर्षाव करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘मागील २५ वर्षांपासून मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अपार आणि अखंड प्रीती अनुभवत आहे. त्याविषयी शब्दांत सांगणे कठीण आहे, तरीही त्याविषयी सांगण्याचा थोडाफार प्रयत्न करते.
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले स्थुलातून, सूक्ष्मातून, तसेच सद्गुरु, संत, साधक आणि कुटुंबीय यांच्या माध्यमातून प्रीतीचा वर्षाव करत असणे
गुरुदेवा, तुम्ही आमच्यावर स्थुलातून, सूक्ष्मातून, तसेच सद्गुरु, संत, साधक आणि कुटुंबीय यांच्या माध्यमातून प्रीतीचा वर्षाव करत आहात. केवळ तुमच्या प्रीतीमुळेच आम्ही सर्व कुटुंबीय आनंदाने साधना करत आहोत. तुम्ही स्थुलातून आमच्याजवळ नसलात, तरीही तुमच्या अस्तित्वाची सतत जाणीव होते, ती केवळ तुमच्या प्रीतीमुळेच ! आश्रमातील साधक एकमेकांची सर्व प्रकारे काळजी घेतात, हे पाहून साधकांमध्ये तुमची प्रीती जाणवते.
२. गुरुदेवांच्या प्रीतीमुळे साधकांनी एकमेकांना साहाय्य करणे आणि साधकांमध्ये ‘प्रीती’ या गुणाची वृद्धी होणे
काही कारणास्तव साधक घरी असतांना त्यांचा वाढदिवस असल्यास आश्रमातील साधक घरी असलेल्या साधकाला भ्रमणभाष करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. आम्ही घरी असतांना रुग्णाईत झाल्यास आश्रमातील साधक आमची विचारपूस करतात. ते आम्हाला ‘तुम्हाला महाप्रसाद पाठवू का ?’, असे विचारतात. हे सर्व गुरुदेवांच्या कृपेनेच होत आहे. गुरुदेवांच्या प्रीतीमुळे साधकांना ‘प्रीती’ हा दैवी गुण शिकता येत आहे आणि साधकांच्या विचारसरणीत पालट होत आहे.
‘हे भगवंता, कृपाळू गुरुदेवा, सजीव-निर्जीव अशा सर्वांवर प्रेम करणार्या तुमच्या प्रीतीविषयी कितीही लिहिले, तरीही ते अल्पच आहे. ‘तुमची प्रीती अनुभवत मलाही तुमच्यासारखे इतरांवर निरपेक्ष प्रेम करता येऊ दे’, अशी तुमच्या सुकोमल चरणी प्रार्थना आहे.’
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |