उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. समर्थ मंगेश पागनीस हा या पिढीतील एक आहे !
५४ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्ग लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला सॅन होजे (अमेरिका) येथील चि. समर्थ मंगेश पागनीस (वय ५ वर्षे) !
ज्येष्ठ कृष्ण षष्ठी (२७.६.२०२४) या दिवशी चि. समर्थ पागनीस याचा वाढदिवस आहे. चि. समर्थ ‘सॅन होजे’ (अमेरिका) येथे रहातो. त्याची ६६ टक्के आध्यात्मिक पातळीची आजी (श्रीमती मंगला पागनीस (वडिलांची आई)) सनातनच्या देवद, पनवेल येथील आश्रमात रहाते. त्या अमेरिकेला त्याच्याकडे गेल्या असतांना त्यांना समर्थविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
चि. समर्थ पागनीस याला ५ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !
‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेपालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
१. प्रेमळ आणि समंजस
‘चि. समर्थ पुष्कळ प्रेमळ आणि समंजस आहे. तो त्याच्या लहान भावाला प्रेमाने सांभाळतो. तो त्याचा लहान भाऊ आणि मित्र यांना स्वतःजवळील वस्तू किंवा खाऊ आनंदाने देतो.
२. धर्माचरणाची आवड
अ. तो प्रतिदिन सकाळी उठल्यावर ‘कराग्रे वसते लक्ष्मी …’, ‘समुद्रवसने देवी …’ हे श्लोक आणि सप्तर्षींनी सांगतलेला ‘हरि ॐ निसर्गदेवोभव वेदं प्रमाणम् ।’ हा मंत्र म्हणतो. अंघोळ झाल्यावर शाळेत जातांना तो देवाला, परम पूज्यांच्या छायाचित्राला आणि घरातील सर्वांना नमस्कार करतो.
आ. तो प्रतिदिन कपाळावर टिळा लावतो.
इ. त्याला सात्त्विक कपडे आवडतात.
ई. एकदा आम्ही आमच्या एका नातेवाइकांकडे गेलो होतो. तिथे वाढदिवसानिमित्त केक कापत होते. ते पाहिल्यावर समर्थ त्यांना म्हणाला, ‘‘आपण वाढदिवसानिमित्त केक कापायचा नाही.’’
३. देवाची ओढ
अ. तो गाडीत बसल्यावर जयघोष करून कृष्ण आणि श्री गुरु यांचा श्लोक म्हणतो. तो गाडीमधे महिषासुरमर्दिनीचे स्तोत्र लावायला सांगतो. त्याला मारुति, श्रीराम, श्रीकृष्ण आणि इतर देवता यांच्या गोष्टी ऐकायला आवडतात. त्याला मंदिरात जायला आवडते.
आ. अमेरिकेत त्याच्याकडे असतांना मी समष्टीसाठीचा नामजप करत असतांना (माझ्याकडे समष्टी नामजप करायची सेवा आहे.) माझ्या समवेत तोही तो नामजप करायचा. आता तो मारुति आणि कृष्ण यांचा नामजप करतो.
इ. त्याला नामजप करायला सांगितल्यावर तो म्हणतो, ‘‘नामजप केवळ माझी जीभ करत नाही, तर माझे हृदय, माझ्या शरिरातील हाडे, माझे सर्व अवयव नामजप करतात.’’
ई. त्याची आत्या सौ. अश्विनी सुखटणकर साप्ताहिक सत्संगाची लिंक पाठवते. समर्थ तो सत्संग ऑनलाईन ऐकतो.
४. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती असलेला भाव
अगदी लहान असल्यापासून त्याच्या मनात सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांविषयी भाव आहे. तो प्रत्येक गोष्ट त्यांना सांगून करतो. शाळेत जातांना तो प.पू. डॉक्टरआबांना नमस्कार करतो आणि त्यांना सांगून शाळेत जातो. शाळेत पारितोषिक मिळाल्यावर ‘परम पूज्यांनी दिले’, असे म्हणतो. त्याला मिळालेला खाऊ तो सूक्ष्मातून परम पूज्यांना देऊन मग खातो. तो इतरांशी प्रेमाने वागतो, तेव्हा ‘तुला हे कुणी शिकवले’, असे विचारल्यावर तो म्हणतो, ‘‘मला डॉ. आबांनी सांगितले आहे.’’ त्याला स्वप्नातही परम पूज्य दिसतात.
५. जाणवलेले पालट
अ. लहान भावाची समंजसपणे काळजी घेतो.
आ. आई-बाबांनी सांगितलेले सर्व ऐकतो.
इ. आधी त्याला लिहायला आणि वाचायला आवडत नसे. आता त्याला लिहायला आणि वाचायला दोन्ही आवडू लागले आहे.
ई. त्याचा घरकामात साहाय्य करण्याचा भाग वाढला आहे.
६. समर्थचे स्वभावदोष
हट्टीपणा, चिडचिड करणे’
– श्रीमती मंगला पागनीस (चि. समर्थची आजी (वडिलांची आई))(आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ७२ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (५.४.२०२४)