वर्धा येथे देवघरात अवैध दारूचा साठा करणार्याला अटक !
वर्धा – येथील एका दारू विक्रेत्याने देवघरातच अवैध दारूची साठवणूक केली आणि तेथूनच तो दारूची विक्री करत होता. पोलिसांनी त्याच्या घरी धाड घातली, तेव्हा प्रथम त्यांना काहीच सापडले नाही; पण देवघरात पहाणी केल्यावर तेथे दारूचा साठा मिळाला. आशिष उपाख्य पिंटू कन्हैयालाल जयस्वाल असे त्याचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याच्या घरातील शीतकपाटात गावठी दारू आढळली आहे. पोलिसांनी देवघर आणि शीतकपाट यांतून २४ सहस्र रुपयांचा हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
संपादकीय भूमिका
|