१६ सहस्र रिक्शाचालकांच्या संपामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल !
कोल्हापूर – नूतनीकरणासाठीच्या विलंब दंडाच्या विरोधात २५ जून या दिवशी जिल्ह्यातील १६ सहस्र रिक्शाचालकांनी बंद पुकारला होता. या संपामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. यात मुख्यत्वेकरून रेल्वेस्थानक, बसस्थानक, रुग्ण, शहरातील मुख्य चौकात नागरिकांना रिक्शा उपलब्ध न झाल्याने त्यांना चालत जावे लागले, तसेच स्वत:चे सामानही रस्त्यावरून ओढत न्यावे लागले. अनेक ठिकाणी वृद्धांना अधिकोष, तसेच महत्त्वाच्या कामांच्या ठिकाणी रिक्शा उपलब्ध न झाल्याने जाता आले नाही. २४ जून या दिवशी रात्री १२ वाजता हा संप चालू झाला आणि २६ जूनच्या पहाटे ५ वाजेपर्यंत चालू होता.