गोरक्षणाचे कार्य करतांना भगवंताने आमचे रक्षण केले ! – सतीश कुमार, राष्ट्रीय अध्यक्ष, गोरक्षा दल आणि राष्ट्रीय संघटनमंत्री, श्री हिंदू तख्त, पंजाब
वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव तृतीय दिवस (२६ जून) : देशाची सुरक्षा आणि धर्मरक्षा
गोवा – गाय वाचली, तर जग वाचेल. सरकार त्याचे कार्य करणार आहे. आपल्याला राष्ट्र, धर्म आणि गोरक्षण यांचे कार्य करायचे असेल, तर लढावे लागणार आहे. धर्म आणि अधर्म यांचे युद्ध निश्चितपणे होणार आहे.एक दिवस हिंदूंना आरपारची लढाई करावी लागणार आहे. त्यासाठी हिंदूंना आतापासून सिद्धता करावी लागणार आहे. अद्यापही भारतात गोहत्या आणि पशूवधगृहे बंद झालेली नाहीत. गोरक्षकांच्या त्रासात कोणतीही न्यूनता आली नाही. आजही गोरक्षकांनाच अटक केली जाते. गोरक्षणाचे कार्य करतांना आमच्यावर अनेक आक्रमणे झाली; पण त्याच्यातूनही भगवंताने आमचे रक्षण केले. देव, धर्म, राष्ट्र आणि गोमाता यांचे रक्षण केले, तर आपल्याला आनंद मिळणार आहे. सरकारने गोमातेला राष्ट्रीय पशू घोषित करून गोहत्या बंद करावी, अशी आमची मागणी आहे, असे प्रतिपादन गोरक्षा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश कुमार यांनी वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या तृतीय दिवशी म्हणजे २६ जून या दिवशी केले.
सतीश कुमार यांनी कारागृहात राहून केलेली साधना
गोरक्षणाच्या कार्यामुळे मी स्वत: ३ वर्षे कारागृहात होतो. तेथे मी भगवंताचे नामस्मरण केले, तसेच ५ ग्रंथांचे लिखाण केले. ज्या दिवशी मला कारागृहात टाकले, त्या दिवशी श्रीकृष्णजन्माष्टमी होती. मृत्यू हा प्रत्येकाला येणारच आहे. तो त्रास शरिराशी संबंधित आहेत, मनाशी नाहीत. त्यामुळे धर्माचे कार्य करायचे असेल, तर भीती सोडून दिली पाहिजे.
गेल्या काही वर्षांपासून हिंदु जनजागृती समिती भारतात हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी प्रयत्न करत आहे. गोव्याच्या भूमीत होत असलेल्या ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’तून हिंदु राष्ट्राची मागणी चालू झाली होती. आता हिंदु राष्ट्राची मागणी देशभरातून उठत आहे !
– सतीश कुमार, राष्ट्रीय अध्यक्ष, गोरक्षा दल |