ॐ प्रमाणपत्राच्या माध्यमातून हलाल प्रमाणपत्राच्या इस्लामी अर्थव्यवस्थेला रोखा ! – नरेंद्र सुर्वे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती, देहली
वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव तृतीय दिवस (२६ जून) : देशाची सुरक्षा आणि धर्मरक्षा
विद्याधिराज सभागृह – अनेक शतकांपासून भारतावर इस्लामी आक्रमण चालू आहे. त्या-त्या कालावधीत आक्रमकांनी आक्रमणाची पद्धत पालटली आहे. अमेरिकेने अर्थव्यवस्थेच्या बळावर जगावर राज्य केले. जगावर राज्य करण्यासाठी अर्थव्यवस्था बळकट करायला हवे, हे लक्षात आल्यावर प्रथम ‘इस्लामिक बँकींग’ चालू झाले. भारतात काँग्रेसचे सरकार असतांना पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी भारतात ‘इस्लामिक बँकींग’ला अनुमती दिली होती; मात्र त्यांचे सरकार गेल्यामुळे यावर कार्यवाही झाली नाही. त्यानंतर हलाल प्रमाणपत्र चालू केले. वर्ष २०१७ मध्ये हलाल प्रमाणपत्राची अर्थव्यवस्था २.१ यु.एस्. ट्रिलियन डॉलर (१ सहस्र ७५४ लाख कोटी रुपयांहून अधिक) होती. वर्ष २०२८ पर्यंत हलाल प्रमाणपत्रांची अर्थव्यवस्था ४ यु.एस्. ट्रिलियन डॉलरपर्यंत (३ सहस्र ४०० लाख कोटी रुपयांहून अधिक) वाढण्याची शक्यता आहे.
‘Om Certificate’ to certify the purity of the Prasad for Prevention of Adulteration of Prasad and encroachment of non-Hindu shopkeepers at the temple premises should be made nation wide
Hindu Rashtra Mahotsav I Goa#Ban_Halal_Certificates pic.twitter.com/HlVHmg0CWu
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 26, 2024
जपान, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स या देशांमध्ये हलाल प्रमाणपत्राला विरोध होत आहे. उत्तरप्रदेशमध्ये नोव्हेंबर २०२३ मध्ये हलाल प्रमाणपत्रावर बंदी घालण्यात आली आहे. बंदीनंतर केलेल्या कारवाईत उत्तरप्रदेशमध्ये ३ सहस्र किलो इतकी हलाल उत्पादने कह्यात घेण्यात आली. महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी असलेल्या दुकानांमध्ये निकृष्ट दर्जाचा प्रसाद दिला जातो. त्यामुळे तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी असलेल्या प्रसादाच्या दुकानांना ‘ॐ प्रतिष्ठान’ कडून ‘ॐ प्रमाणपत्र’ दिले जाणार आहे. ॐ प्रमाणपत्राच्या माध्यमातून हिंदूंनी हलाल प्रमाणपत्राला झटका द्यावा.
हे ही वाचा –
Om Certificate For Hindus : नाशिक येथून ‘ओम प्रतिष्ठान’द्वारे ‘प्रसाद शुद्धी चळवळी’स प्रारंभ !
https://sanatanprabhat.org/marathi/804073.html