लोकसभेत ‘पॅलेस्‍टाईन’ विजयाच्‍या घोषणा देणार्‍या असदुद्दीन ओवैसी यांची खासदारकी रहित करा !

  • वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाच्‍या तिसर्‍या दिवशी झाला ठराव !

  • हर हर महादेव’च्‍या जयघोषात सर्व हिंदुत्‍वनिष्‍ठांनी दिले समर्थन!

डावीकडून श्री. विरेंद्र पांडेय, पू. श्री रामबालकदासजी महात्यागी महाराज, श्री. चक्रवर्ती सुलीबेले, श्री. दीपक राजगोपाल

रामनाथी – भारतीय राज्‍यघटनेच्‍या अनुच्‍छेद १०२ ‘ड’ नुसार संसदेतील कोणत्‍याही सदस्‍याने अन्‍य कुणाल्‍याही देशाला समर्थन देणे बेकायदेशीर आहे. यानुसार त्‍यांचे सदस्‍यत्‍व रहित होते. भारतीय संसदेत शपथ घेतांना अन्‍य देशांशी निष्‍ठा ठेवणे, हा देशद्रोह आहे, तसेच हा भारताचा अपमान आहे. त्‍यामुळे वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवात असदुद्दीन ओवैसी यांचा तीव्र निषेध व्‍यक्‍त करून लोकसभेचे अध्‍यक्ष आणि केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री यांच्‍याकडे असदुद्दीन ओवैसी यांची खासदारकी रहित करण्‍याची मागणी करण्‍याचा ठराव करण्‍यात आला. ‘एम्.आय.एम्.’चे भाग्‍यनगरचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी लोकसभेत ‘लोकसभा सदस्‍यत्‍वा’ची शपथ घेतांना ‘जय भीम, जय मीम’, ‘अल्लाहू अकबर’ या घोषणासमवेत ‘जय फिलीस्‍तिन (पॅलेस्‍टाईन) अशीही घोषणा दिली. या पार्श्‍वभूमीवर हा ठराव करण्‍यात आला.

असदुद्दीन ओवैसी लोकसभेत ‘लोकसभा सदस्‍यत्‍वा’ची शपथ घेतांना

‘जय पॅलेस्‍टाईन’ची घोषणा देणारे उद्या ‘जय पाकिस्‍तान’ची घोषणा देण्‍यास मागेपुढे पहाणार नाहीत !

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवात झालेल्‍या ठरावाविषयी बोलतांना हिंदु जनजागृती समितीचे राष्‍ट्रीय प्रवक्‍ते श्री. रमेश शिंदे म्‍हणाले, ‘‘आज ‘जय पॅलेस्‍टाईन म्‍हणणारे उद्या ‘जय हमास’ आणि त्‍याही पुढे जाऊन ‘जय पाकिस्‍तान’ म्‍हणण्‍यासही कमी करणार नाहीत. त्‍यामुळे ओवैसी यांच्‍यावर निवडणूक लढवण्‍यासाठी कायमस्‍वरूपी बंदी घालण्‍यात यावी, अशी मागणीही वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवात करण्‍यात आली.

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिधीपत्रक –

‘हर हर महादेव’च्‍या जयघोषात याला सर्व हिंदुत्‍वनिष्‍ठांनी समर्थन दिले.

संसदेत सत्ताधारी पक्षाचे सांसद श्री. छत्रपाल सिंह यांनी ‘जय हिंदु राष्‍ट्र’ची घोषणा देणे, हे सकारात्‍मक पाऊल ! – श्री. चेतन राजहंस, राष्‍ट्रीय प्रवक्‍ते, सनातन संस्‍था

श्री. चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था

संसदेमध्‍ये उत्तरप्रदेशचे नवनिर्वाचित खासदार श्री.  छत्रपाल सिंह यांनी शपथ घेतांना ‘जय हिंदु राष्‍ट्र’ असा जयघोष केला. वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवात याविषयीही चर्चा झाली. ‘प्रसारमाध्‍यमांमध्‍ये उपस्‍थित होत असलेली राष्‍ट्रीय सूत्रे तथा हिंदु राष्‍ट्र’ या विषयावर चर्चासत्रामध्‍ये सनातन संस्‍थेचे राष्‍ट्रीय प्रवक्‍ते श्री. चेतन राजहंस यांचा विचारले असता, ते म्‍हणाले, ‘‘वर्ष २०१२ पासून २०२४ पर्यंत होत असलेल्‍या हिंदु राष्‍ट्र अधिवेशनांमध्‍ये जो हिंदु राष्‍ट्राचा जयजयकार होत आहे, त्‍याचीच एक फलश्रुती म्‍हणजेच संसदेत ‘जय हिंदु राष्‍ट्र’ असा जयघोष होणे ही आहे. हे पुष्‍कळ मोठे धैर्य आहे. हे संसदेच्‍या परिभाषेत संसदीय शब्‍दाच्‍या रूपात प्रविष्‍ट झाले पाहिजे. १७ व्‍या लोकसभेत ४ वेळा हिंदु राष्‍ट्र हा शब्‍दप्रयोग करण्‍यात आला; परंतु तो विरोधकांनी केला. प्रथमच सत्ताधारी पक्षाच्‍या खासदाराने हा जयघोष केला. हे एक सकारात्‍मक पाऊल आहे.’’

हिंदु राष्‍ट्र हा राज्‍यघटनाविरोधी शब्‍द नाही !

श्री. राजहंस पुढे म्‍हणाले की, सनातन परंपरेत प्रथमपासूनच हिंदु राष्‍ट्र हा शब्‍द आहे. हिंदु राष्‍ट्र हा राज्‍यघटनाविरोधी शब्‍द नाही. हे राष्‍ट्र हिंदूंचेच होते. प्रसारमाध्‍यमांनी त्‍याला विवादास्‍पद स्‍वरूप दिल. त्‍यावर आपण प्रतिवाद केला पाहिजे. माध्‍यमे हिंदुविरोधी शक्‍ती चालवत आहेत. हिंदु राष्‍ट्राच्‍या विरोधात जाणीवपूर्वक प्रचार केला जात आहे. त्‍यामुळे त्‍याला विरोध करण्‍याचे दायित्‍व आपले सगळ्‍यांचे आहे.

राज्‍यघटनेनुसारच आवैसी यांच्‍यावर राष्‍ट्रद्रोहाचा गुन्‍हा नोंदवला गेला पाहिजे ! – रमेश शिंदे

श्री. रमेश शिंदे

‘प्रसारमाध्‍यमांमध्‍ये उपस्‍थित होत असलेली राष्‍ट्रीय सूत्रे तथा हिंदु राष्‍ट्र’ या विषयावर चर्चासत्रामध्‍ये बोलतांना श्री. रमेश शिंदे म्‍हणाले, ‘‘राज्‍यघटना पालटणार’ असे सर्व जण आता वारंवार म्‍हणत आहेत. राज्‍यघटनेनुसार ‘जय पॅलेस्‍टाईन’चा जयघोष होऊ शकतो का ?’, हा सर्वप्रथम प्रश्‍न आहे. राज्‍यघटनेत ‘१०२ डी’मध्‍ये लिहिले आहे की, भारताचा कुणी सांसद त्‍याची निष्‍ठा भारत सोडून अन्‍य कुठल्‍या राष्‍ट्राप्रती दाखवत असेल, तर त्‍याचे संसदेचे सदस्‍यत्‍व रहित होईल. भारतविरोधी काम, तसेच भारतीय राज्‍यघटनेविषयी स्‍वनिष्‍ठा न ठेवता भारत सोडून कुठल्‍याही अन्‍य देशाप्रती दाखवणे याला राज्‍यघटनेतच बंदी आहे. त्‍यामुळे एम्.आय.एम्. पक्षाचे खासदार ओवैसी यांचे संसदेचे सदस्‍यत्‍व राज्‍यघटनेनुसारच रहित झाले पाहिजे !

‘इंडी’ आघाडीला भीती आहे की, राज्‍यघटना पालटणार, तर त्‍यांनी आता राज्‍यघटनेत जे लिहिले आहे, त्‍याचा अवलंब करावा. त्‍यानुसार ओवैसी यांचे सदस्‍यत्‍व रहित झाले पाहिजे. आपण ‘भारतमाता की जय’, ‘वन्‍दे मातरम्’ म्‍हणू शकत नाही, ‘वन्‍दे मातरम्’ म्‍हणतांना काही जण उभे रहात नाहीत, तर पॅलेस्‍टाईन यांची माता कशी झाली ? जो देश अस्‍तित्‍वाच नाही, त्‍यासाठी हे लोक ‘जय पॅलेस्‍टाईन’ म्‍हणत आहेत. ‘जय पॅलेस्‍टाईन’ म्‍हणायचे असेल, तर तिथे जाऊन म्‍हणा. इथे राहून हे म्‍हणू शकत नाही, हे जोपर्यंत आपण सांगणार नाही, तोपर्यंत काही होणार नाही. हिंदु कार्यकर्त्‍यांनी मुंबईत पाकचा झेंडा जाळल्‍यावर त्‍याविषयीचा खटला सर्वोच्‍च न्‍यायालयात गेल्‍यावर न्‍यायाधिशांची विचारले, ‘‘भारतीय दंड विधानाच्‍या कुठल्‍या कलमानुसार पाकचा झेंडा जाळणे गुन्‍हा आहे, असे कशात म्‍हटले आहे ?’’ भारताचा झेंडा थोडीच जाळत आहोत ? जे आपल्‍यावर आक्रमण करत आहेत, त्‍यांचा झेंडा जाळणार नाही तर काय करणार ? आवैसी यांची केवळ संसद सदस्‍यत्‍व रहित होऊन चालणार नाही, तर त्‍यांच्‍यावर राष्‍ट्रद्रोहाचा गुन्‍हा नोंद झाला पाहिजे. याचसमवेत लोकसभेत लोकसभा सदस्‍यात्‍वाची शपथ घेतांना भाजप खासदार श्री. छत्रपाल सिंह गंगवार यांनी ‘जय हिंदु राष्‍ट्र, जय भारत’ असा जयघोष केला. या सकारात्‍मक कृतीचे आम्‍ही स्‍वागत करतो.’’

ठरावाला सहमती देतांना हिंदुत्वनिष्ठ

हे ही वाचा –

Asaduddin Owaisi Oath : असदुद्दीन औवेसी यांनी लोकसभेत शपथ घेतल्‍यानंतर ‘जय पॅलेस्‍टाईन’ आणि ‘अल्लाहू अकबर’च्‍या दिल्‍या घोषणा !
https://sanatanprabhat.org/marathi/807926.html