संत आणि महर्षि करत असलेल्या आध्यात्मिक स्तरावरील साहाय्यामुळेच हिंदु राष्ट्राची स्थापना होणे शक्य ! – परात्पर गुरु डॉ. आठवले
मागील भाग वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/807777.html
३. हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी अनेक संतांनी केलेले साहाय्य !
३ आ. प.पू. मोहन जाधव (वय ८२ वर्षे) यांनी ‘पृथ्वीवर हिंदु राष्ट्राची स्थापना करणे सोपे व्हावे’, या उद्देशाने अमेरिकेहून रामनाथी, गोवा येथील आश्रमात येऊन अग्निहोत्र करणे : वर्ष १९९८ मध्ये मी ‘ईश्वरी राज्याची स्थापना’ या नावाचा एक ग्रंथ लिहिला होता. त्या वेळी मला वाटत होते की, ‘आपण भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना करावी.’ माझा विचार केवळ भारतापुरताच मर्यादित होता. अमेरिकेत एक भारतीय संत आहेत. ते अग्निहोत्राच्या प्रसारासाठी सर्वत्र जातात. त्यांनी केलेल्या अग्निहोत्रामुळे पुष्कळ लाभ होतो. आता तिसरे महायुद्ध होणार आहे. एखाद्या स्थानी कुणी सकाळ-संध्याकाळ भावपूर्ण रीतीने अग्निहोत्र केले, तर फलस्वरूप म्हणून तेथील ३ ते ३० किलोमीटरच्या परिसरात परमाणु युद्धाच्या विकिरणांचा (रेडिएशनचा) दुष्परिणाम होणार नाही. त्यामुळे ते संत ठिकठिकाणी अग्निहोत्र करत आहेत. पृथ्वीवर त्यांचे एकूण १०,००० शिष्य असून ते वेगवेगळ्या ठिकाणी रहातात.
वर्ष २०१० मध्ये एकदा मला त्या संतांचा दूरभाष आला आणि आमचे पुढील संभाषण झाले.
प.पू. मोहन जाधव : मी गोव्याच्या रामनाथी आश्रमात येऊन काही विधी करू इच्छितो. येऊ शकतो का ?
परात्पर गुरु डॉ. आठवले : आपण एवढे चांगले कार्य करत आहात. या वयात आपण अमेरिकेहून रामनाथी आश्रमात अग्निहोत्र करण्यासाठी येणार आहात. आपण एवढे कष्ट का घेत आहात ?
प.पू. मोहन जाधव : मी तेथे येऊन जो विधी करीन, त्यातून चैतन्य निर्माण होईल. त्यामुळे तुम्हाला पृथ्वीवर हिंदु राष्ट्राची स्थापना करायला सोपे होईल !
आरंभी माझा दृष्टीकोन ‘केवळ भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना करायची’, असा होता आणि ते संत म्हणाले, ‘संपूर्ण पृथ्वीवर हिंदु राष्ट्र आणायचे आहे.’
(क्रमश:)
पुढील भाग वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/808488.html