रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

१. श्री. अमित काशिराम गुरव (सचिव, मराठा वॉरियर्स गडकिल्ले संवर्धक), ठाणे, महाराष्ट्र.

अ. ‘आश्रम पाहून माझे मन पुष्कळ प्रसन्न झाले.

आ. ‘साधना म्हणजे नक्की काय आहे ? आणि ती कशी करावी ?’, हे मला समजले.

इ. यापुढे ‘या आश्रमात माझ्याकडून काही ईश्वरी सेवा घडावी’, अशी माझी इच्छा आहे.’

२. श्री. संदीप अनंत तुळसकर (श्री परशुराम तपोवन आश्रम), वसई रोड (प.), जिल्हा पालघर, महाराष्ट्र.

अ. ‘आश्रमातील सर्व साधक समर्पित भावाने ओतप्रोत आहेत.

आ. अशा प्रकारचा आश्रम पृथ्वीच्या पाठीवर पाहिला नाही.’

३. श्री. अमोल शिंदे (प्रांत प्रमुख, हिंदु जागरण [लँड जिहाद], पश्चिम महाराष्ट्र), अहिल्यानगर, महाराष्ट्र.

अ. ‘आश्रमात भारतीय संस्कृतीच्या संवर्धनासाठी होत असलेले आपले प्रयत्न पुष्कळ चांगले आहेत.’

४. महंत आचार्य पीठाधीश्वर डॉ. अनिकेतशास्त्री महाराज (अखिल भारतीय संत समिती, धर्मसमाज, महाराष्ट्र प्रदेश प्रमुख), महर्षि पंचायतन, सिद्धपीठम्, नाशिक.

अ. ‘मला कलियुगातून पुनश्च सत्ययुगात प्रवेश झाल्याची अनुभूती आली.

आ. संपूर्ण परिसरात देवतांचा अंश रममाण आहे.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : २४.६.२०२४)

सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून मान्यवरांनी दिलेला अभिप्राय

श्री. अमोल शिंदे (प्रांत प्रमुख, हिंदु जागरण [लँड जिहाद], पश्चिम महाराष्ट्र), अहिल्यानगर, महाराष्ट्र.

‘ज्या प्रमाणात आपण सूक्ष्म जगताविषयी संशोधन केले, तसेच त्याविषयीचे आधुनिक यंत्रणेद्वारे प्रयोग करून निष्कर्ष काढले, ते लक्षात घेतल्यास असे वाटते, ‘आपल्याकडून यासंदर्भात पुष्कळ मोठे कार्य होणार आहे.’ (२४.६.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक