सातारा येथे वडिलांसह मुलाला शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायला लावून १ कोटींची फसवणूक !
सातारा – शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमीष दाखवून चौघांच्या टोळीने सातारा येथील वडील आणि मुलगा यांना १ कोटी ८ लाख ४० सहस्र ४५७ रुपयांना फसवले आहे. या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात ४ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना १७ मार्च ते ५ जून २०२४ या कालावधीत घडली आहे.
शेअर मार्केटच्या माध्यमातून सी.आय.एन्.व्ही. ॲपद्वारे तक्रारदारांना पैसे गुंतवण्यास सांगितले. तरुणाने त्या ॲपवर पाहिले असता चांगला परतावा मिळत असल्याचे पाहून युवकाने पैसे काढण्याचा प्रयत्न केला; मात्र पैसे निघत नव्हते. अशावेळी आरोपींनी पैसे काढण्याअगोदर शासनाचा कर भरावा लागेल, असे सांगून वेळोवेळी रक्कम भरण्यास सांगितली. यातूनच फसगत होत गेली आणि रकमेचा आकडा वाढत गेला.
संपादकीय भूमिका
|