पुणे येथे संतप्त धर्मांधाकडून बहिणीच्या हिंदु प्रियकराच्या वडिलांची अमानुष हत्या !
बहिणीला हिंदु प्रियकराने पळवून नेल्याचा संशय
पुणे – येथील येरवडा भागात बहिणीला पळवून नेल्याच्या संशयातून प्रेयसीच्या भावाने तिच्या प्रियकराच्या वडिलांची हत्या केली. कटाळू लहाडे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी तरुणीचा भाऊ इस्माईल शेख याला कह्यात घेतले आहे. लहाडे आणि शेख कुटुंबीय एकाच परिसरात वास्तव्यास आहे. कटाळू यांचा मुलगा आणि इस्माईल याची बहीण या दोघांमध्ये मैत्री होती. २५ जूनला कटाळू यांचा मुलगा आणि संबंधित तरुणी घरातून निघून गेले. बहिणीला कटाळू यांच्या मुलानेच फूस लावून पळवून नेल्याचा संशय इस्माईल याला आला. त्या रागातूनच कटाळू यांच्यावर इस्माईलने धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या केली. (बहीण हिंदु धर्मीय होऊ नये, यासाठी वाटेल त्या थराला जाणारे धर्मांध !- संपादक)
लहाडे रस्त्यात उभे असतांना दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी एकाने लहाडे यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले. यामध्ये लहाडे यांच्या डोक्यातून आणि हातातून प्रचंड रक्तस्त्राव झाला अन् त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. लहाडे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.