‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या पहिल्या दिवशीच्या उद्घाटन सत्रात करावे लागलेले आध्यात्मिक उपाय !
‘२४ जून २०२४ या दिवशी सकाळी ९.३० वाजता रामनाथी, फोंडा, गोवा येथील रामनाथी देवस्थानाच्या सभागृहात हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ला आरंभ झाला.
१. सभागृहात चालू झालेल्या या महोत्सवाच्या सकाळच्या उद्घाटनाच्या सत्रात सकाळी ९.३० ते १०.३० या कालावधीत मला सभागृहाच्या वातावरणात कुठलाही त्रास जाणवला नाही. वातावरण शांत, उत्साही आणि चैतन्यमय जाणवत होते.
२. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे हे वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाचे बीजवक्तव्य करू लागल्यावर त्यांच्या तोंडाला कोरड पडू लागणे आणि त्यांच्यासाठी आध्यात्मिक उपाय केल्यावर, तसेच त्यांना पाणी प्यायला दिल्यावर त्यांना व्यवस्थित बोलता येऊ लागणे
सकाळी १०.३० वाजता हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे हे वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाचे बीजवक्तव्य (सध्याची भारताची स्थिती, महोत्सवाचा उद्देश, महोत्सवातील उद्बोधक सत्रे इत्यादी माहिती) करू लागले. त्यांची २ – ४ वाक्ये झाल्यावर ‘त्यांच्या तोंडाला कोरड पडत आहे’, असे मला जाणवले. मी लगेच त्यांच्यासाठी आध्यात्मिक स्तरावरील उपाय करायला आरंभ केला. ‘त्यांच्यावर वरून त्रासदायक (काळी) शक्ती येत आहे’, असे मला जाणवले. मी त्यांच्यासाठी माझ्या ओठांसमोर उजव्या हाताचा तळवा २ – ३ सें.मी. अंतरावर धरून ‘महाशून्य’ हा नामजप करत उपाय करू लागलो. हा उपाय २ – ३ मिनिटे केल्यावर मी माझ्या डाव्या हाताचा तळवा भूमीच्या दिशेने आणि त्यावर उजव्या हाताचा तळवा आकाशाच्या दिशेने ठेवून २ – ३ मिनिटे ध्यान लावले आणि सद्गुरु डॉ. पिंगळे यांच्यावर वरून येणारी काळी शक्ती अडवण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना पाणी देण्यासही एका साधकाला सांगितले. यामुळे ‘त्यांना चैतन्य मिळावे आणि त्यांच्या घशाची कोरडही दूर व्हावी’, हा उद्देश होता. त्यानंतर त्यांचा आवाज थोडा सुधारला. त्यानंतर मी माझ्या उजव्या हाताचा तळवा माझ्या अनाहतचक्रावर ठेवून ‘चैतन्य’ हा नामजप करत उपाय करू लागलो. तेव्हा सद्गुरु डॉ. पिंगळे यांना थोडा खोकला आला. त्यामुळे एका साधकाने त्यांना पुन्हा पाणी दिले. पाणी प्यायल्यावर सद्गुरु डॉ. पिंगळे व्यवस्थित मार्गदर्शन करू लागले, तसेच त्यांचा आवाजही थोडा मोठा झाला. त्यानंतर त्यांना बोलायला कुठलीही अडचण आली नाही आणि त्यांचे पुढचे ५ – ७ मिनिटांचे मार्गदर्शन निर्विघ्नपणे पार पडले.’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२४.६.२०२४)