दाखले देण्यासाठी विद्यार्थ्यांची गैरसोय करू नका !
खासदार सुनील तटकरे यांच्या दापोली तहसील प्रशासनाला सूचना
दापोली – विविध प्रकारचे दाखले देण्यासाठी विद्यार्थ्यांची गैरसोय करू नका, अशा सूचना खासदार सुनील तटकरे यांनी दापोली तहसील प्रशासनाला दिल्या आहेत.
दापोली तहसील प्रशासनाकडून उत्पन्नाच्या दाखल्यांवर वेळेत प्रक्रिया केली जात नाही. याविषयी पालकांनी थेट खासदार तटकरे यांच्याकडे तक्रार केली होती. पालकांच्या तक्रारीनुसारी ‘शेतीचा हंगाम चालू असल्याने शेतीची कामे चालू आहेत. त्यात शाळा आणि महाविद्यालयांत उत्पन्नाचा दाखला तातडीने हवा असतो. गुणपत्रक मिळाल्यानंतर नवीन प्रवेशाच्या वेळी हा दाखला काढण्यासाठी पालकांची सेतू कार्यालयात गर्दी दिसते; मात्र वारंवार खेपा मारूनही दाखले मिळत नाहीत. दाखले मिळण्यास तहसील कार्यालयातून विलंब होतो.
संपादकीय भूमिकाअशा सूचना प्रशासनाला का द्याव्या लागतात ? विद्यार्थ्यांची गैरसोय करणारे आणि त्यांना वारंवार हेलपाटे मारायला लावणारे, यांना केवळ सूचना करून नव्हे, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली, तरच या परिस्थितीला थोडा तरी आळा बसेल ! |