गडचिरोलीतील ५ गावांमध्ये नक्षलवाद्यांना गावबंदी !

१० दिवसांत १३ गावांकडून प्रवेशबंदी !

गडचिरोली – २४ जून या दिवशी भामरागड तालुक्यातील लाहेरी उपपोलीस ठाणे हद्दीतील मोरडपार, आलदंडी, कोयर, गोपणार आणि मुरुंगल या ५ गावांतील नागरिकांनी एकत्रितपणे नक्षलवाद्यांना गावबंदी केली. त्याविषयीचा ठरावही पोलिसांना सादर केला. अशा प्रकारे एकूण १० दिवसांत १३ गावांनी नक्षलवाद्यांना प्रवेशबंदी केली आहे.

नुकतेच नक्षलवादी नेता गिरीधर याने पत्नीसह आत्मसमर्पण केले. नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. त्याअंतर्गत नक्षलवाद्यांना पुन्हा विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘आत्मसमर्पण योजना’ राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत हे आत्मसमर्पण करण्यात आले.

संपादकीय भूमिका 

नक्षलवादाच्या विरोधात ग्रामस्थ सतर्क आणि कृतीशील होणे, हे स्तुत्य होय ! आता सरकार आणि प्रशासन यांनी नक्षलवाद समूळ नष्ट होण्यासाठी पावले उचलली पाहिजेत !