भक्ताच्या झोळीत ‘अतीशुद्ध’ घालण्यासाठी सद्गुरूंना स्वतःला परमशुद्ध व्हावे लागणे
सद्गुरु
अतीशुद्धामध्ये योग्य असे दुसरे तत्त्व मिसळून अतीशुद्ध पेलवून घ्यावे लागते. सद्गुरूंनी अतीशुद्ध ते (आत्मतत्त्व) पचवलेले असते. इतकेच नव्हे, तर तेच ‘अतीशुद्ध’ त्यांना भक्ताच्या झोळीत घालावयाचे असते. त्याकरता अतीशुद्धता मोडून, त्यात शांती आणि प्रेम यांचे भरण करून परमशुद्ध करावे लागते. अर्थातच सद्गुरूंना स्वतःला तसे व्हावे लागते.
– स्वामी विद्यानंद (साभार : ग्रंथ ‘चिंतनधारा’)