हडपसर पोलीस ठाण्याच्या कोठडीतून पसार झालेल्या चोराला दीड घंट्यात पकडले !
पुणे – हडपसर पोलीस ठाण्यात असलेल्या कोठडीतून (लॉकअप) चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेला आरोपी पसार झाला. (पोलिसांच्या तावडीतून आरोपी पसार होतो, हे पोलिसांना लज्जास्पद आहे ! पोलिसांचा गलथानपणाच यातून लक्षात येतो. – संपादक) गजबजलेल्या परिसरात पोलीस ठाणे असल्याने हडपसर पोलिसांसह गुन्हे शाखेकडून त्वरित आरोपीचा शोध घेण्यास प्रारंभ झाला. दीड घंट्यात आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने दिवे घाटातून कह्यात घेत, पुन्हा हडपसर पोलिसांच्या कह्यात दिले. गोविंद उपाख्य पिंट्या घोडके असे पसार झालेल्या चोरट्याचे नाव आहे. हडपसर पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या चोरीच्या गुन्ह्यात घोडके याला अटक करण्यात आली होती. आरोपी पळून गेल्याची माहिती समजताच पोलीस उपायुक्त आर्. राजा यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपी कसा पसार झाला ? याविषयीचे चौकशीचे आदेश वरिष्ठ अधिकार्यांनी दिले आहेत.