वाशी-तुर्भे लिंक रोडवरील उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी एक लेन बंद !
नवी मुंबई – वाशी-तुर्भे लिंक रोडवरील उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी वाशीहून तुर्भे स्टोअरकडे (ठाणे) जाणारी लेन बंद करण्यात आली आहे. तुर्भे सेक्टर २१ नवी मुंबई महापालिका परिवहन आगाराकडून ठाणे-बेलापूर रस्त्यावर तुर्भे रेल्वेस्थानकाकडे जाणार्या उड्डाणपुलाच्या ठिकाणचा एक भाग काही प्रमाणात निखळलेल्या अवस्थेत आहे. त्या अनुषंगाने त्याची पहाणी करण्यात आली. त्यासंदर्भातील दुरुस्ती करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने उड्डाणपुलावरील ठाणे-बेलापूर रस्त्यावर तुर्भे रेल्वेस्थानकाकडे जाणारी वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद करण्यात आली आहे.