पुणे येथील ‘द लिक्वीड लिझर लाऊंज’ हॉटेल सील
|
पुणे – येथील एफ्.सी. रोडवरील एका पबच्या शौचालयात युवक अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी हॉटेलच्या मालकासह ५ कर्मचार्यांना कह्यात घेतले आहे. उत्पादन शुल्क विभागाकडून हॉटेल ‘सील’ करण्यात आले असून हॉटेलमधील सामग्री जप्त करण्यात आली आहे. उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी चरणसिंह राजपूत हे पुण्यातील या हॉटेलजवळ तातडीने गेल्याने उत्पादन शुल्क विभागाकडूनही कारवाई चालू झाली आहे. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाकडून या संपूर्ण ‘पार्टी’चे विश्लेषण चालू आहे.
‘द लिक्वीड लिझर लाऊंज’ या हॉटेलमधील अमली पदार्थांच्या प्रकरणाचा पुण्यातील ‘पतित पावन संघटने’कडून निषेध करण्यात आला. या हॉटेलच्या निषेधार्थ ‘पतित पावन संघटने’कडून २४ जून या दिवशी बारची तोडफोड करण्यात आली.
२ पोलीस अधिकारी निलंबित !
या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल माने आणि साहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील यांनाही निलंबित करण्यात आले आहे.