महत्त्वाची कागदपत्रे शोधूनही न सापडणे; परंतु सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी ‘ती कागदपत्रे कुठे आहेत ?’, ते सूक्ष्मातून पाहून अचूकपणे सांगणे
अनुमाने ७ – ८ वर्षांपूर्वी नांदूर मधमेश्वर, तालुका निफाड, जिल्हा नाशिक येथील ‘श्री मृग व्याघ्रेश्वर’ या महादेवाच्या मंदिराच्या विश्वस्तांनी महत्त्वाच्या कागदपत्रांची धारिका निफाड येथील हिंदु जनजागृती समितीचे सेवक श्री. धनंजय काळुंगे यांच्याकडे दिली होती. त्यांनी ती धारिका नाशिक जिल्हा समिती समन्वयक श्री. शशिधर जोशी यांच्याकडे दिली होती.
मागील मासात मंदिर विश्वस्तांनी ती धारिका निफाड येथील समिती सेवकांकडे परत मागितली. निफाड समिती सेवकांनी ती धारिका श्री. शशिधर जोशीकाकांना परत देण्यास सांगितले. काही दिवसांनी जोशीकाका म्हणाले, ‘‘आता ती धारिका कुठे आहे ?’, ते मला आठवत नाही. मी जुने घर सोडून दुसर्या घरात रहायला आलो आहे. आताही मी माझ्या घरात पुष्कळ शोधले; पण धारिका सापडत नाही.’’ त्यानंतर मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाकांना भ्रमणभाषवर एक धारिका मिळत नसल्याचे सांगितले. दुसर्या दिवशी त्यांनी मला सांगितले, ‘‘ती धारिका जोशीकाकांच्या जुन्या घरी डाव्या बाजूच्या पोटमाळ्यावर (लॉफ्टवर) आहे.’’ ते घर बरेच दिवस बंद होते. तेथे २ साधक गेले. ते घर उघडून साधकांनी घरातील लॉफ्टवर शोध घेतल्यावर त्यांना मंदिराची कागदपत्रे असलेली पिशवी मिळाली. या प्रसंगावरून ‘सद्गुरु गाडगीळ यांची सूक्ष्मातून जाणण्याची शक्ती अफाट आहे’, हे पुन्हा लक्षात आले. असे सद्गुरु आपल्याला मिळाले, त्याबद्दल सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– (सद्गुरु) नंदकुमार जाधव, जळगाव
|