लोहियानगर (पुणे) येथे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते अक्षय ढावरे यांच्यावर धर्मांधांच्या टोळीचे प्राणघातक आक्रमण !
लोहियानगरमधून होत आहे हिंदूंंचे पलायन !
पुणे – लोहियानगर येथील मातंग समाजाचे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते अक्षय ढावरे यांच्यावर २३ जून या दिवशी अतुल खान, सलमान बल्ली शेख, अस्मल पटेल, युसूफ, आसिफ मेंढा या जिहादी टोळीने अक्षय ढावरे यांच्यावर प्राणघातक आक्रमण करून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला. ढावरे हे धर्मांधांना विरोध करत असल्यामुळे त्यांच्यावर आक्रमण करण्यात आल्याचे बोलले जात आहे. यामध्ये तलवारीचा वार अडवतांना ढावरे यांचा अंगठा तुटला असून ते घायाळ झाले आहेत. या प्रकरणी नागेश ढावरे यांनी तक्रार दिली आहे. ‘लीगल राइट्स ऑब्झर्वेटरी’च्या ‘एक्स’ या सामाजिक माध्यमाच्या खात्यावरून ही माहिती प्रसारित झाली आहे. याविषयी हिंदुत्वनिष्ठांनी संताप व्यक्त केला आहे.
१. येथे मुसलमान गुंडांची मोठी दहशत आहे. दहशतीच्या जोरावर येथील हिंदूंना सण साजरे करण्यास मज्जाव केला जात आहे.
२. शेकडो वर्षांची परंपरा असलेली एक यात्रा या भागातून निघते. या यात्रेतील ‘देवाची काठी’ उंचावून मिरवणूक काढण्याचा अधिकारही येथील मुसलमानांनी या वर्षी नाकारला आणि काठी आडवी करून यात्रा मार्गस्थ करावी लागली. (छत्रपतींच्या महाराष्ट्रात हिंदूंवर सण दहशतीत साजरे करण्याची वेळ येणे पोलिसांना लज्जास्पद ! हिंदूंची दु:स्थिती दूर करण्यासाठी हिंदूसंघटन हाच पर्याय आहे ! – संपादक)
३. पुण्यातील लोहियानगर या भागात पिढ्यान्पिढ्या रहात आलेल्या हिंदूंना आता स्वत:ची घरेदारे सोडून पळून जाण्याची वेळ आली आहे.
४. तक्रारी करूनही हिंदूंच्या दयनीय स्थितीवर पोलीसही निष्क्रीय झाले आहेत. (असे पोलीस कायद्याचे राज्य काय देणार ? – संपादक)
पुण्याचे होत असलेले इस्लामीकरण !पुण्यातील बर्यांच भागांत झपाट्याने वाढलेली मुसलमानांची लोकसंख्या, मुसलमान गुंडांकडून चालवण्यात येणारे अवैध धंदे, अवैध धंद्यांमधून निर्माण होणार काळा पैसा, काळ्या पैशांतून पोसली जाणारी गुन्हेगारी आणि या गुन्हेगारांच्या माध्यमातून निर्माण केली जाणारी दहशत यामुळे पुण्याची ‘गजवा-ए-पुणे’च्या (पुण्याचे इस्लामीकरण होण्याच्या )दिशेने वेगाने वाटचाल होत आहे, असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही. ही हिंदूंसाठी धोक्याची घंटा आहे ! |
संपादकीय भूमिका
|