तळेगाव स्थानक येथील श्री चौराईदेवीच्या मंदिरातील दानपेटीसह ८ सहस्र रुपयांचा मुद्देमाल चोरीला !
तळेगाव (जिल्हा पुणे) – शहराजवळील मुंबई-पुणे महामार्गाजवळच्या डोंगरावरील श्री चौराईदेवीच्या मंदिरातील स्टीलच्या दानपेटीसह पितळी त्रिशूल आणि चांदीची गणपतीची मूर्ती २० जूनला रात्री चोरांनी पळवली. दोघे तोंडाला कापड बांधून चोरी करतांनाच्या घटनेचे चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमेर्यात दिसले असून हा व्हिडिओ सामाजिक माध्यमावर प्रसारित झाला आहे. या प्रकरणी प्रवीण सोपान मुर्हे यांनी तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे. श्री चौराईदेवी मंदिरातील ५ सहस्र रुपये किमतीची दानपेटी, १ सहस्र रुपये किमतीचा पितळी त्रिशूळ आणि २ सहस्र रुपये किमतीची ३५० ग्रॅम वजनाची चांदीची श्री गणेशमूर्ती असा ८ सहस्र रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकाहिंदूंची मंदिरे असुरक्षित असणे संतापजनक आहे ! |