Kanishka Blast : ‘कनिष्क’ विमानातील बाँबस्फोटात मृत्यूमुखी पडलेल्यांना कॅनडामध्ये वाहण्यात आली श्रद्धांजली !

कनिष्क विमानातील बाँबस्फोटात ठार झालेल्यांना श्रद्धांजली भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकारी

ओटावा (कॅनडा) – कॅनडामध्ये भारतीय उच्चायुक्तालयाने वर्ष १९८५ मध्ये झालेल्या एअर इंडियाच्या कनिष्क विमानातील बाँबस्फोटात ठार झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली. परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनीही सामाजिक माध्यमांत पोस्ट करून आतंकवादावर टीका केली.

टोरंटो आणि व्हँकुव्हर शहरांतील भारतीय वाणिज्य दूतावासांनी २३ जून या दिवशी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

भारतीय उच्चायुक्तांनी सांगितले की, या घृणास्पद कृत्याला ३९ वर्षे उलटून गेली आहेत; परंतु दुर्दैवाने आतंकवाद आजही आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांसाठी धोका बनला आहे. दुर्दैव हे आहे की, अनेक प्रसंगी अशा प्रकारचे कृत्य कॅनडामध्ये नित्य होऊ दिले जाते.