E-Medical Visa : बांगलादेशातून भारतात उपचारांसाठी येणार्‍या लोकांसाठी लवकरच ‘ई-मेडिकल व्हिसा’ सुविधा चालू होणार !

बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी देहली – नुकत्याच बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना २ दिवसांच्या भारत दौर्‍यावर येऊन गेल्या. त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. यानंतर पंतप्रधान मोदी यांनी बांगलादेशातून भारतात उपचारांसाठी येणार्‍या लोकांसाठी लवकरच ‘ई-मेडिकल व्हिसा’ सुविधा चालू करणार असल्याचे घोषित केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, बांगलादेशाच्या उत्तर-पश्‍चिम भागातील लोकांच्या सोयीसाठी बांगलादेशातील रंगपूरमध्ये नवीन सहाय्यक उच्चायुक्तालय चालू करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. बांगलादेश हा भारताचा सर्वांत मोठा विकास भागीदार असून आम्ही बांगलादेशासमवेतच्या आमच्या संबंधांना सर्वोच्च प्राधान्य देतो.

गेल्या वर्षभरात आम्ही मिळून अनेक महत्त्वाचे लोककल्याणकारी प्रकल्प पूर्ण केले आहेत. दोन्ही देशांत भारतीय रुपयांत व्यापार चालू झाला आहे.

संपादकीय भूमिका

या योजनेचा लाभ बांगलादेशातील हिंदूंना होणार कि मुसलमानांना ? बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठीही सरकारने योजना लागू केली पाहिजे आणि देशातील बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले पाहिजेत, असेच हिंदूंना वाटते !