Parliament Monsoon Session : पुन्हा आणीबाणी लादण्याचे धाडस कुणी करणार नाही, असा संकल्प करा ! – पंतप्रधान मोदी

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ !

पंतप्रधान मोदी

नवी देहली – भारताच्या लोकशाहीवर २५ जूनला काळा डाग लागला होता, त्याला ५० वर्षं पूर्ण होत आहेत. भारताची नवीन पिढी ही गोष्ट कधीच विसरणार नाही की, भारताची राज्यघटना तेव्हा पूर्णपणे नाकारली गेली होती. देशाला कारागृह करून टाकले होते. लोकशाही दाबून टाकली होती. ५० वर्षांपूर्वी केली गेलेली ही कृती पुन्हा कधी करण्याचे कुणी धाडस करणार नाही, असा संकल्प देशातील नागरिक करतील. आपण जिवंत लोकशाहीचा संकल्प करूया, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी केले. हे अधिवेशन ४ जुलैपर्यंत चालणार आहे. त्यानंतर ते स्थगित होऊन पुन्हा २२ जुलैपासून चालू होईल. हेअधिवेशनाचे दुसरे सत्र असेल. त्यात देशाचा पूर्ण अर्थसंकल्प मांडला जाईल. त्याआधी नव्या खासदारांचा शपथविधी, राष्ट्रपतींचे अभिभाषण आणि त्यावर पंतप्रधानांचे उत्तर, तसेच खासदारांची भाषणे होणार आहेत.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, देशाच्या जनतेला विरोधी पक्षांकडून योग्य पावले टाकली जाण्याची अपेक्षा आहे. आतापर्यंत बरीच निराशा झाली आहे; पण कदाचित् या १८ व्या लोकसभेत विरोधी पक्ष देशाच्या सामान्य नागरिकांच्या भूमिकांचा योग्य सन्मान राखतील, अशी अपेक्षा आहे.