तडसर (सांगली) येथील तलाठ्याला लाच घेतांना अटक !
भ्रष्टाचाराने पोखरलेला महसूल विभाग !
कडेगाव (जिल्हा सांगली) – तक्रारदार आणि त्यांचा पुतण्या यांनी एकमेकांना शेतभूमींची विक्री केली होती. त्याची सात-बारा नोंद करून उतारा देण्यासाठी १० सहस्र रुपयांची लाच घेतांना तालुक्यातील तडसर येथील तलाठी वैभव तारळेकर (वय ४५ वर्षे) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केली. तारळेकर यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वैभव तारळेकर यांना दिला होता ‘आदर्श तलाठी’ पुरस्कार ?लाचखोर संशयित वैभव तारळेकर यांना गतवर्षी ‘आदर्श तलाठी’ पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यांनीच लाच घेतली. ‘शासकीय कामासाठी लाचेची मागणी करणार्यांची तक्रार द्या. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल’, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक संदीप पाटील यांनी केले आहे. |