अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी श्री शांतादुर्गादेवी आणि श्री रामनाथदेव यांना साकडे !

फोंडा, २३ जून (वार्ता.) – हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी प्रतिवर्षीप्रमाणे यंदा १२ वे ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ अर्थात् ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ २४ ते ३० जून २०२४ या कालावधीत ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथे होणार आहे. या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी २३ जून या दिवशी सकाळी कवळे येथील श्री शांतादुर्गा मंदिर आणि रामनाथी येथील श्री रामनाथ मंदिर येथे जाऊन श्रींच्या चरणी वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी प्रार्थना केली. या वेळी कवळे येथील श्री शांतादुर्गा मंदिराचे पुजारी श्री. कुमार सरज्योतिषी यांनी देवीकडे स्वयंस्फूर्तीने ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा’, यासाठी भावपूर्ण साकडे घातले. या वेळी उपस्थित सर्वांचीच भावजागृती झाली. रामनाथी येथील श्री रामनाथ मंदिराच्या पुजार्‍यानेही श्रींच्या चरणी वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी साकडे घातले.