सुख आणि दुःख यांत आनंदाची धार प्रवाहित करणे, हे सद्गुरूंचे मर्म असणे

सद्गुरु

सुख-दुःख हा तर प्रकृतीचा खेळ आहे; परंतु दुःखाचेही सुखात परिवर्तन करून सुख-दुःख मिळून केवळ एका आनंदाचीच बरसात करणे, हे सद्गुरूंचे कार्य आहे. सुखाच्या वर, खाली आणि पोटात दुःख भरून ठेवणे, हे प्रकृतीचे कार्य आहे; परंतु त्याच दुःखाचे असेल, तेथेच परिवर्तन करून आनंदाच्या वर, खाली, पोटात आनंदच उचंबळून आणणे, हे सद्गुरूंचे ब्रीद आहे. दुःखानंतर सुख आणि सुखानंतर दुःख, हे प्रकृतीचे चक्र आहे; परंतु हे चक्र बंद पाडून सुखात, तसेच दुःखात एक आनंदाची धार प्रवाहित करणे, हे सद्गुरूंचे मर्म आहे. मायेच्या सागरात परमार्थाचा प्रवास करणार्‍यांना, अज्ञानाच्या अंधारातून सुरेख मार्गदर्शन सद्गुरूंकडून घडत असते.

– स्वामी विद्यानंद (साभार : ग्रंथ ‘चिंतनधारा’)