‘हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्यातून साधना कशी करावी ?’, याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हिंदुत्वनिष्ठांना केलेले मार्गदर्शन !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

ईश्वरी नियोजनानुसार त्या त्या काळात कृतज्ञतापूर्वक धर्मसेवा केल्यास व्यक्तीचा मनोलय आणि बुद्धीलय होऊन ईश्वराशी एकरूप होणे शक्य !

(पू.) अधिवक्‍ता हरिशंकर जैन

१. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रयत्न न केल्यास मनुष्यजन्माचे सार्थक कसे होणार ?

‘प्रत्येक युगात केव्हा काय होणार ?’, याचे वेळापत्रक ठरलेले असते. त्याचा ताळमेळ ठेवून आणि काळाची आवश्यकता आहे, तोपर्यंत आपल्याला हे कार्य करायचे आहे. ‘ईश्वराने आपल्याला साधना आणि धर्मसेवा करण्यासाठी एवढा वेळ दिला’, यासाठी त्याच्याप्रती कृतज्ञता वाटायला हवी. हिंदु राष्ट्र स्थापन होईलच; पण आपण त्यासाठी काहीच केले नाही, तर आपली साधना आणि सेवा कशी होणार ? या मनुष्यजन्माचे सार्थक कसे होणार ?

२. पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांनी ‘मला मोक्ष नको, तर ‘प्रत्येक जन्मात हिंदु राष्ट्राची सेवा करता यावी’, अशी इच्छा व्यक्त करणे

ईश्वराचे प्रत्येक नियोजन परिपूर्ण असते. आपण केवळ त्यानुसार कृती करायची. साधनेत पुढच्या टप्प्याला गेलो की, ‘का आणि कसे करायचे ?’, असे प्रश्नच मनात रहात नाही. श्रद्धा ठेवून जे कार्य करतो, त्यातूनच पुष्कळ आनंद मिळू लागतो. मध्यंतरी देहलीचे पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन आले होते. ते म्हणाले, ‘‘मला मोक्ष आदी काही नको. ‘प्रत्येक जन्मात हिंदु राष्ट्राचे काम सेवा म्हणून करता यावे’, एवढीच माझी इच्छा आहे !’’ त्यांचे विचार किती सुंदर आहेत ! अन्य काही जण म्हणतात, ‘आम्हाला मोक्ष पाहिजे. मी त्यासाठीच कार्य करणार.’पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांच्याप्रमाणे कार्य नाही, तर सेवा करण्यातील आनंद सर्वांनी घ्यायला हवा !

३. समाजसेवेतून धर्माची सेवा आणि साधना न झाल्याने व्यक्तीच्या मन अन् बुद्धी यांचा लय न होणे

समाजसेवक जे कार्य करतात, त्यातून धर्माची सेवा आणि साधना होत नाही. धर्मसेवा केल्यामुळे व्यक्तीच्या मन आणि बुद्धी यांचा लय होतो. एखाद्या नोकराला पाठोपाठ कामे सांगितली, तर तो काही न बोलता ती कामे करत रहातो. यामुळे त्याचा ‘मनोलय’ होऊ लागतो. यामध्ये तो स्वतःच्या बुद्धीचा वापरही करत नाही. ‘अगदी याच प्रकारे ‘हिंदु राष्ट्राची स्थापना करणे’, हे कार्य करून आपल्याला मनोलय आणि बुद्धीलय करायचा आहे. अशा प्रकारे साधना करून आपल्याला ईश्वराशी एकरूप व्हायचे आहे.’