बुलढाणा येथे विधवांकडून वडाचे पूजन !
बुलढाणा – येथील दत्तपूर गावातील सुवासिनींनी वटपौर्णिमेनिमित्त विधवांना कुंकू लावले, त्यांचे पूजन केले आणि त्यांनाही वडपूजनाच्या कार्यक्रमात सहभागी करून घेतले. या वेळी उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या. या कार्यक्रमात नवविवाहितांपासून ७० वर्षांच्या वृद्ध महिलाही सहभागी झाल्या होत्या. (वटपौर्णिमा हे व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी केले जाते. हे व्रत म्हणजे पातिव्रत्याचे प्रतीक आहे. असे असतांना ज्यांच्या पतीचा आधीच मृत्यू झालेला आहे, अशांनी हे व्रत केल्यास त्यांना काय लाभ होणार ? उलट धर्मशास्त्राच्या विरोधात कृती केल्याने त्यातून धर्महानीच घडेल ! – संपादक)