हिंदु ‘इकोसिस्टीम’चे (यंत्रणेचे) महत्त्व आणि वैचारिक आतंकवादाला प्रत्युत्तर !
श्री. कपिल मिश्रा यांचा परिचय
देहली येथील श्री. कपिल मिश्रा ‘हिंदु इकोसिस्टीम’चे संस्थापक आहेत, तसेच ते हिंदूसंघटन करण्यात कार्यरत आहेत. हिंदूंवर होणार्या अत्याचाराविरुद्ध ते वैध रूपाने आवाज उठवतात. त्यांनी स्वतः नेतृत्व करून देहली दंगलीतील पीडित हिंदूंना साहाय्य केले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच देहली दंगलीचे खरे स्वरूप उघड झाले. ‘हिंदु इकोसिस्टीम’च्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण भारतात लक्षावधी युवकांना जोडण्याचे कौतुकास्पद कार्य केले. जागतिक स्तरावर ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ (जागतिक स्तरावर हिंदुत्वाचे उच्चाटन) या परिषदेच्या माध्यमातून हिंदुत्वाची अपकीर्ती करण्याचे मोठे षड्यंत्र रचले जात होते, तेव्हा श्री. कपिल मिश्रा यांनी संपूर्ण जगातील हिंदूंसह प्रसिद्ध विचारवंत आणि अभ्यासक यांना जोडून या परिषदेच्या विरोधात जागृती करण्याचे महत्त्वाचे कार्य केले. त्यांच्यातील नम्रता आणि सहजता या गुणांमुळे ते देशभरातील लोकांशी जोडले गेले आहेत.
‘भारताचे हिंदु राष्ट्र करण्याच्या अभियानासाठी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था कार्यरत असून त्यांचे कार्य खरोखरच यज्ञस्वरूप आहे.’
– श्री. कपिल मिश्रा, संस्थापक, ‘हिंदु इकोसिस्टीम’, देहली.
१. भारतातील हिंदु आणि देश विरोधी शक्ती एकच !
‘संपूर्ण जगात भारत हा एक असा देश आहे, जेथे देशविरोधी लोक आहेत. तेच हिंदुविरोधी आहेत आणि जे हिंदुविरोधी आहेत, तेच भारतविरोधी आहेत. या संपूर्ण जगात कोणताही धर्म आणि राष्ट्र यांच्यामध्ये हा संबंध मिळणार नाही. देशांतर्गत शक्ती असो किंवा देशाबाहेरील शक्ती असो, धर्मांतर करणारी शक्ती असो किंवा नक्षलवाद आणि आतंकवाद यांच्या माध्यमातून देशाचे विघटन करणारी शक्ती असो, ती हिंदुविरोधी असेल, तर भारतविरोधीही असणारच आहे. या देशात एकही देशविरोधी शक्ती मिळणार नाही, जी हिंदुविरोधी नसेल. त्यामुळे राष्ट्र आणि धर्म यांच्यातील अशी एकरूपता संपूर्ण जगात कुठेही पहायला मिळत नाही.
२. भारतात खोलवर पसरलेली देश आणि हिंदु विरोधी ‘इकोसिस्टीम’
जहांगीरपुरी हा देहलीतील गरीब झोपडपट्टीचा भाग आहे. तेथे भंगार वस्तूंचा व्यवसाय करणारे मुसलमान आणि बांगलादेशी घुसखोर बहुतांश संख्येने रहातात. वर्ष २०२२ मध्ये या जहांगीरपुरीमध्ये रामनवमीची शोभायात्रा निघाली होती. या यात्रेवर धर्मांधांनी दगडफेक केली, बाँब फेकले आणि गोळ्याही चालवल्या. हे आक्रमण करणारे तेथील भंगार वस्तूंची विक्री करणार्या कबाडी वस्तीचे लोक होते. यात देहली पोलीसचे एक अधिकारी मेधालाल यांना गोळी लागली.
वास्तविक रामनवमीच्या शोभायात्रेत जाणार्या कोणत्याही व्यक्तीच्या हातात कोणतेही शस्त्र किंवा दगड नव्हते. त्यांच्यामध्ये कसलीही हिंसा करण्याची भावना नव्हती, तरीही त्यांच्यावर आक्रमण करण्यात आले. अशा प्रकारे देशभरात अन्यत्रही आक्रमणे झाली. त्यानंतर जे झाले, ते देशातील बहुतेक लोकांना ठाऊक नाही.
भारत ‘हिंदु राष्ट्र’च आहे !
‘पृथ्वी सूर्याभोवती फिरते, हे लोकांनी मान्य केले नव्हते, तेव्हा ती सूर्याभोवती फिरत होती. तुम्ही मान्य केल्यावरही ती सूर्याभोवती फिरत होतीच. त्यामुळे तुमच्या मानणे किंवा न मानणे याचा पृथ्वीच्या सूर्याला प्रदक्षिणा घालण्यावर काही परिणाम होत नाही. त्याचप्रमाणे जो कुणी ‘भारत हिंदु राष्ट्र आहे’, हे मान्य करत नाही, तेव्हा त्याच्या मानणे किंवा न मानणे यामुळे भारताचे हिंदु राष्ट्र असण्यावर काहीच परिणाम होत नाही. तुम्ही मान्य कराल, तेव्हा हिंदु राष्ट्र असेल आणि तुम्ही मान्य न केल्यावरही हा देश हिंदु राष्ट्रच आहे.’
– श्री. कपिल मिश्रा
३. देहली दंगलीतील भंगार व्यावसायिकाला वाचवण्यासाठी देशातील मातब्बर अधिवक्त्यांची फौज
देहलीच्या जहांगीरपुरी येथे अंसार नावाचा एक भंगारवाला रहातो. त्याला देहली पोलिसांनी अटक केली. पोलीस त्याला पकडून घेऊन चालले असतांना तो उद्दामपणे हसत होता, हे अनेकांनी प्रसारमाध्यमांवर पाहिले. त्याच्या मनात कसलेही भय नव्हते. तेव्हा आपल्याला वाटले की, याला भय कसे वाटत नाही, हा तर झोपडपट्टीत रहाणारा एक सर्वसाधारण भंगारवाला आहे. त्याने एका पोलीस अधिकार्याला गोळी मारल्याने पोलीस त्याला पकडून घेऊन जात आहेत, तरीही त्याच्या मनात कसलेही भय का नाही ? त्याचे उत्तर १२ घंट्यांच्या आतच मिळाले. रात्री ८ वाजता देहली पोलिसांनी अंसारला अटक केली आणि दुसर्या दिवशी सकाळी ९ वाजण्यापूर्वीच सर्वाेच्च न्यायालयात देशातील सर्वांत मोठे ५ अधिवक्ते त्याच्यासाठी उभे राहिले. ते लहानसहान अधिवक्ते नव्हते, तर एक दिवस न्यायालयात जाऊन लढण्यासाठी २० लाख रुपये शुल्क आकारणारे अधिवक्ते होते. त्यांनी १२ घंट्यांच्या आत नोटीस देऊन सर्वाेच्च न्यायालयात खटल्याची सुनावणी केली. आपल्यासारख्यांनी स्वतःचे घरदार विकून पैसे गोळा केले, तरी या अधिवक्त्यांची भेटही मिळणार नाही. त्यांनी आपल्यासाठी उभे रहाणे, ही फार दूरची गोष्ट आहे.
४. आतंकवाद्यांचे खटले लढण्यासाठी ‘जमियत उलेमा-ए-हिंद’कडून आर्थिक साहाय्य
‘पोलीस अधिकार्यावर गोळी चालवणार्या एका भंगारवाल्यासाठी १२ घंट्यांच्या आत देशातील सर्वांत मोठे अधिवक्ते कसे काय उभे राहिले असतील ?’, असा प्रश्न आपल्याला पडणे स्वाभाविक आहे. देशात ‘जमियत उलेमा-ए-हिंद’ नावाची संस्था आहे. या संस्थेने या अधिवक्त्यांचे शुल्क दिले. ही संस्था देशात आतंकवादी आक्रमणे होतात, तेव्हा त्यातील आरोपींना साहाय्य करते. उदा. कर्णावतीमध्ये (गुजरात) आतंकवादी आक्रमणात ५६ लोक मारले गेले होते. त्या आक्रमणातील ३० आतंकवाद्यांना न्यायालयात शिक्षा मिळाली. अर्थात् ते केवळ आरोपी नव्हते, तर दोषी आतंकवादी होते. या ३० ही जणांचे खटले लढणार्या संस्थेचे नाव ‘जमियत उलेमा-ए-हिंद’ होते. अशाच प्रकारे धर्मांतर करण्याविषयी पकडलेल्या मौलवींच्या (इस्लामच्या धार्मिक नेत्यांच्या) पाठीशीही हीच संस्था उभी रहाते. या संस्थेने म्हटले होते, ‘श्रीराममंदिर बनले, तरीही आमच्याजवळ शक्ती येईल, तेव्हा ही ‘जमियत उलेमा-ए-हिंद’ त्याला हटवण्याचे काम करील.’
५. ‘जमियत उलेमा-ए-हिंद’च्या मागे ‘हलाल प्रमाणपत्रा’चे आर्थिक बळ
‘जमियत उलेमा-ए-हिंद’ उघडपणे खटले लढत असून त्यासाठी मातब्बर अधिवक्ते उपलब्ध करत आहे, याचा अर्थ ते पांढर्या पैशांनी खटला लढत आहेत. त्यांच्या पैशांचा स्रोत शोधल्यावर तो ‘हलाल (इस्लामनुसार जे वैध ते) प्रमाणपत्रा’च्या माध्यमातून येत असल्याचे समजले. या हलाल अर्थव्यवस्थेवर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी सुंदर पुस्तक लिहिले आहे. हलाल प्रमाणपत्र असलेल्या कोणत्याही उत्पादनाची खरेदी-विक्री झाल्यास त्यातून मिळणार्या पैशाचा एक भाग ‘जमियत उलेमा-ए-हिंद’कडे जातो. या पैशांनीच आतंकवाद्यांचे खटले लढवले जात आहेत. केवळ मांसाहारी पदार्थांसाठीच नाही, तर भ्रमणभाषसंच, बांधकाम क्षेत्र, गाड्या, सदनिका इत्यादी उत्पादनांवर ‘हलाल प्रमाणपत्रा’चा शिक्का मारला जातो. गल्लीमध्ये एखादा माणूस केस कापण्याचे लहानसे काम करत असतो; परंतु हलालच्या नावाने तोही पैसे दान करत असतो.
आपण केस कापण्यासाठी पैसे देतो, तेव्हा आपण स्वतःचे शीर कापण्यासाठी त्यांना निधीच देत असतो. देहलीतील दंगलीच्या काळात आपण दूरचित्रवाणीवर एक लांब केस असलेला तरुण देहली पोलिसांवर बंदूक रोखून उभा असलेला पाहिला. त्याचे छायाचित्र ध्वनीचित्रफीतीतून सर्वांच्या समोर आले होते. संपूर्ण देशाला त्याचे नाव शाहरुख पठाण असल्याचे ठाऊक होते; परंतु रात्री ९ वाजता ‘एन्.डी.टी.व्ही.’ वर रवीश कुमार यांनी येऊन त्याचे नाव अनुराग मिश्रा असल्याचे खोटेच सांगितले. याचा अर्थ गोळी चालवण्यासाठी जो माणूस आहे, त्याला वाचवण्यासाठी पत्रकार आहे, त्याच्या घराची देखभाल करण्यासाठी नेता आहे आणि त्याच्यासाठी उभे रहाणारे मोठे अधिवक्तेही आहेत. धर्मांधांची ‘इकोसिस्टीम’ ही अशी आहे.
६. अल्पवयीन मुलांनी पोलीस ठाण्यावर दगडफेक करून पेटवून दिले !
मागे देहलीच्या दरियागंज पोलीस ठाण्यावर दगडफेक करून आग लावल्याची घटना घडली होती. १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलांनी पोलीस ठाण्यावर दगडफेक केली आणि पोलीस ठाणे पेटवून दिले. पोलिसांनी त्या मुलांना पकडले. पोलिसांनी या मुलांना पकडून एक घंटाही झाला नसेल, तोपर्यंत तेथे न्यायदंडाधिकारी आले. ते म्हणाले, ‘‘१८ वर्षांहून खालील सर्व लहान मुलांना जामीन देऊन घेऊन जात आहे.’’ न्यायदंडाधिकार्याला घेऊन येणारा हर्षवर्धन होता, जो तत्कालीन काँग्रेस सरकारच्या ‘नॅशनल ॲडव्हायझरी कौन्सिल’चा सदस्य होता. नंतर समजले की, तो स्वतःच किशोरवयीन मुलांसाठी अनाथालय चालवत आहे. दगडफेक करून पोलीस ठाणे जाळून टाकणारी मुलेही त्याच अनाथालयातून आली होती. पोलिसांनी त्यांना पकडले. त्यानंतर घंटाभरातच अधिवक्ते आले आणि त्या सर्वांना सोडवून घेऊन गेला. पोलीस ठाण्याला आग लावण्यासाठी १८ वर्षांच्या खालील किशोरवयीन मुलांना प्रशिक्षण देण्यात आले होते; कारण त्यांना लवकरच जामीन मिळू शकणार होता. अशा प्रकारच्या व्यवस्थेच्या विरोधात आपल्याला लढायचे आहे. ते दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून स्वतःला विकण्यासाठी सिद्ध आहेत.
७. लव्ह जिहादपासून हिंदु मुलींना वाचवणार्यांना खलनायक बनवण्याचा प्रयत्न
लव्ह जिहादच्या प्रकरणात धर्मांधांना वाचवण्यासाठी दूरचित्रवाहिनीचे पत्रकार आणि अधिवक्ते यांची फौज सिद्ध आहे. ते लव्ह जिहाद हे प्रेम असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतात. त्या विरोधात कुणी आवाज उठवत असतील, तर त्यांना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न केला जातो. हेच भूमी जिहाद, धर्मांतर आदींच्या संदर्भातही होत आहे.
८. धर्मांधांकडून हिंदु मुलांचे धर्मांतर करण्याचे षड्यंत्र
अ. मध्यप्रदेशच्या दामोंहोमध्ये एक शाळा चालवली जाते. या शाळेच्या आत मात्र मुलांचे धर्मांतर करण्यात येत होते. या शाळेच्या आतून एक भुयार बनवले गेले होते. त्यातून त्या मुलांना मशिदीत नेले जात होते. तेथे त्यांना अजान (मुसलमानांना मोठ्या आवाजात नमाजासाठी आमंत्रित करणे) शिकवले जात होते. तेथे मुलांचे धर्मांतर केले जात असल्याचे त्यांच्या आई-वडिलांना साधी कल्पनाही नव्हती.
आ. गाझियाबादमध्ये (उत्तरप्रदेश) एक मुलगा ‘ऑनलाईन गेम’ खेळत होता. त्याच्यासमवेत आणखी ४ जण हा खेळ खेळत होते. ते ४ जण त्याला सांगतात, ‘जर तू कुराणची ही ओळ वाचलीस, तर तू खेळ जिंकशील.’ तो मुलगा कुराणातील ओळ वाचतो. त्यानंतर ते त्याला म्हणतात, ‘तू खेळ जिंकलास. आता तुला यावर विश्वास ठेवावा लागेल !’ अशा प्रकारे एक वर्षात त्याचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला गेला. ‘ऑनलाईन’ खेळ खेळणार्या मुलांनाही जाळ्यात अडकवले जात आहे. महाविद्यालयात जाणार्या मुलींवरही मोहाचे जाळे टाकले जात आहे. कुणीही फळे, भाजी, केस कापण्ो, बेकरीतील पदार्थ यांसाठी व्यय करत असाल, तर तो पैसाही तिकडे वळवला जात आहे. हिंदुविरोधी भाषण देणार्यांचे चेहरे दिसतात; परंतु हिंदु आणि राष्ट्र विरोधी शक्ती यांचे जाळे प्रत्यक्षात खोलवर पसरले आहे.
९. ‘हिंदु-हिंदु, भाई-भाई’, हिंदु एकतेचा मूलमंत्र
हिंदूंनी ‘इकोसिस्टीम’ची एक व्यवस्था बनवली, तर ती सर्वांसाठी उपयुक्त होईल. ‘हिंदु-हिंदु, भाई-भाई’, हा हिंदु एकतेचा मूलमंत्र आहे. आपण आपापसांत बंधूभाव ठेवला नाही, तर आपलाच हिंदु बांधव आपलाच विरोधक होऊन जाईल. ‘हिंदु-हिंदु, भाई-भाई’ हा मूलमंत्र हिंदु एकतेची ‘इकोसिस्टीम’ बनण्याचे कार्य करील, जी सर्वप्रथम आपल्याला वाचवण्याचे कार्य करील आणि नंतर ‘भारत हे हिंदु राष्ट्र आहे’, हे मान्य करून घेण्याचेही कार्य करील. यात जातीभेद ही सर्वांत मोठी अडचण आहे; कारण आपल्याला तोडणारा हा आपल्याच आतमध्ये बसला आहे; कारण बाहेरचे मुल्ला, मौलवी आणि ख्रिस्ती प्रचारक आपल्याला ओळखता येतात; पण आपल्यातच बसलेले घरभेदी जातीभेदाच्या नावावर विभाजन करण्याचे कार्य करत आहेत. त्यामुळेच मला असे वाटते की, ‘हिंदु इकोसिस्टीम’सारखी एखादी व्यवस्था बनवतांना आपापसांतील भेदभाव सर्वप्रथम नष्ट करणे आवश्यक आहे. ‘जातीचा अभिमान ठेवा; परंतु जातीभेद ठेवू नका.’ भारतात अशी कोणतीही जात नाही, ज्यात राजा, संत, शूरवीर, संन्यासी, विरांगना झाल्या नाहीत. त्यामुळे कुणीच उच्च-नीच नाही. त्यामुळे जो आपल्यामध्ये जातीभेद निर्माण करतो, तो प्रथम आपल्यात फूट पाडणार आहे आणि नंतर आपल्याला कापून काढणार आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
हिंदु विभाजित झाला, म्हणजे देश विभाजित झाला. तेव्हा जातीभेदातून बाहेर पडून ‘मी केवळ हिंदु आहे’, असा परिचय आपल्या अंतरात्म्याला करून द्या. संघटित होऊन हिंदु पीडित आणि शोषित बंधू यांना बळकट करण्याचे कार्य करूया. धर्मासाठी लढणारे पुढे होऊन कार्य करतील आणि त्यांना साथ देण्याचे कार्य आपण करूया. कोणत्याही गावातील आणि कोणत्याही हिंदूवर अत्याचार होत असेल, तर त्याला वाचवण्यासाठी देशाच्या राजधानीपर्यंत उभे रहाणारे लोक २४ घंट्यांच्या आत सिद्ध व्हावेत, असा दृष्टीकोन घेऊन आपण लोकांनी कार्य करायला आरंभ करावा.’
– श्री. कपिल मिश्रा, संस्थापक, ‘हिंदु इकोसिस्टिम’, देहली.