गुरुकृपा
‘गुरुशिष्यांचे मंगल नाते प्रस्थापित झाल्यानंतर सद्गुरु हेच जणू आरसा होतात आणि त्या आरशात शिष्य स्वतःलाच पाहू लागतो. सद्गुरु रूप आरशाची किमया अशी की, साध्या आरशाप्रमाणे तो ‘जसे असेल, तसे दाखवत नाही’, तर ‘जसे असावे, तसे दाखवतो.’ एक प्रकारे ‘आदर्श शिष्य कसा असावा ?’, हे सद्गुरूंच्या ‘शब्द’ आणि ‘परा’ या दोन्ही अवस्थांतून शिष्याच्या हृदयावर प्रतिबिंबित होऊ लागते. स्वाभाविकपणे शिष्याला त्या अवस्थाप्राप्तीची तळमळ लागते. वेगाने वाहणार्या पाण्याला केवळ वाट करून द्यावी लागते. ज्या बळाने ती वाट आकारली जाते, त्यालाच ‘गुरुकृपा’ असे म्हणतात.’
– स्वामी विद्यानंद (साभार : ग्रंथ ‘चिंतनधारा’)