Plot To Kill Judge : इस्लामी कट्टरवाद्यांनी रचला आहे ज्ञानवापीच्या सर्वेक्षणाचा आदेश देणार्या न्यायाधिशांच्या हत्येचा कट !
न्यायाधिशांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी !
वाराणसी (उत्तरप्रदेश) – वाराणसीतील ज्ञानवापीच्या सर्वेक्षणाचा आदेश देणारे न्यायाधीश रविकुमार दिवाकर यांना इस्लामी कट्टरवाद्यांकडून धमक्या मिळत आहेत. त्यांच्या हत्येचा कट रचला जात आहे. न्यायाधीश रविकुमार दिवाकर यांची सुरक्षा अपुरी असून ती वाढवण्याची आवश्यकता आहे, असे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) म्हटले आहे.
Plot to kill Judge Ravikumar Diwakar, who ordered the survey of Gyanvapi in Varanasi, by I$l@mic Fundamentalist Forces
The NIA has called for increased security for the judge due to these threats.
Why are the liberal wokes silent ? Don’t they feel that democracy is in danger ? pic.twitter.com/NnOYQDbsyT
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 22, 2024
रविकुमार दिवाकर हे बरेली येथे अतिरिक्त सत्र न्यायाधीशपदी आहेत. त्यांनी वर्ष २०२२ मध्ये भारतीय पुरातत्व विभागाला ज्ञानवापीचे वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याची अनुमती दिली होती. काही दिवसांपूर्वी अदनान खान नावाच्या आतंकवाद्याने त्यांना धमकी दिली होती. इस्लामी कट्टरपंथी त्यांची हत्या करण्याचा कट रचत असल्याचे ‘एन्.आय.ए.’ने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर ‘एन्.आय.ए.’ न्यायालयाचे विशेष न्यायाधीश विवेकानंद शरण त्रिपाठी यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या महानिबंधकांना पत्र लिहून न्यायाधीश रविकुमार दिवाकर यांची सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली आहे.
उत्तरप्रदेशच्या आतंकवाद विरोधी पथकाने ३ जून २०२४ या दिवशी अदनान खानविरोधात गुन्हा नोंदवला होता. न्यायाधीश दिवाकर यांनी बरेलीच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षकांना पत्र देखील लिहिले होते की, त्यांना आंतरराष्ट्रीय भ्रमणभाष क्रमांकांवरून धमक्या मिळत आहेत. त्यांच्या कुटुंबियांनाही जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
संपादकीय भूमिका
|