केरळमधील कासारगोड केंद्रीय विद्यापिठात ‘स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया’कडून भारतमाता आणि राष्ट्रध्वज यांचा अवमान !
कासारगोड (केरळ) – कासारगोड केंद्रीय विद्यापीठ येथे कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या काळात अनेक संस्थांनी त्यांच्या कला सादर केल्या. याच उत्सवात ‘स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया’ या साम्यवादी विद्यार्थी संघटनेकडून (‘एस्.एफ्.आय.’कडून) भारतमाता आणि भारताचा राष्ट्रध्वज यांचे अवमानकारक चित्र प्रदर्शित करण्यात आले.
(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही राष्ट्रीय भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून राष्ट्रद्रोह्याने केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)
चित्रात भारतमाता राष्ट्रध्वज परिधान करतांना दाखवण्यात आली. यामध्ये २ तरुणांनी भारतमातेला धरलेले दाखवण्यात आले. सामाजिक माध्यमांतून हे चित्र प्रसारित झाल्यावर लोकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
संपादकीय भूमिकानास्तिकतावादी साम्यवाद्यांच्या या विद्यार्थी संघटनेकडून झालेल्या या अवमानावरून या संघटनेवर कायमस्वरूपी बंदी घालण्या मागणी राष्ट्रभक्तांनी केली पाहिजे ! |