Pakistani Steal Soft Drink : पाकिस्तानमध्ये शीतपेयांच्या बाटल्यांनी भरलेल्या ट्रकचा अपघात !

लोकांनी बाटल्या चोरून नेल्या !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पंजाब प्रांतातील फैसलाबाद येथे शीतपेयांच्या बाटल्यांनी भरलेल्या ट्रकला अपघात झाला. अपघातानंतर लोकांमध्ये या बाटल्या चोरून देण्याची स्पर्धा चालू झाली. पोलीस घटनास्थळी पोचण्याआधीच संपूर्ण ट्रक रिकामा झाला होता. या घटनेचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे.

लुटण्याच्या शर्यतीत केवळ पुरुषच नाही, तर स्त्रिया आणि मुलेसुद्धा एकापेक्षा एक वरचढ ठरल्याचे या व्हिडिओत दिसून आले. शीतपेये लुटण्याचा हा व्हिडिओ पाकमधील वृत्तवाहिन्यांच्या मथळ्यांचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे ऑक्टोबर २०२३ मध्ये पाकिस्तानी नागरिकांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ लाहोर शहरात आंदोलन करतांना शीतपेयांच्या बाटल्या फोडून निषेध नोंदवला होता. महिनाभरापूर्वी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ पाकिस्तानी जनतेने अनेक नामांकित आस्थापनांच्या शीतपेयांवर बहिष्कारही घातला होता. यातून हा सगळा केवळ दिखाऊपणा असून फुकट गोष्ट मिळाल्यावर पाकिस्तान्यांची कशा प्रकारे झुंबड उडते ?, हे यावरून उघड झाले.

संपादकीय भूमिका 

यातून पाकिस्तान्यांची मनोवृत्ती दिसून येते !