‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चे पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांना निमंत्रण !

‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ची निमंत्रण पत्रिका पहातांना पू. संभाजीराव भिडेगुरुजी

सांगली – येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष देसाई यांनी भेटून १२ व्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च निमंत्रण दिले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्याशी दूरभाषवरून चर्चा करून त्यांना अधिवेशनासाठी येण्यासाठी नम्र विनंती केली. ‘‘माझे तुमच्या कार्याला आशीर्वाद आहेत. कार्य चांगले होण्यासाठी मी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो’’, असे आशीर्वचन या प्रसंगी पू. भिडेगुरुजी यांनी दिले.