Pakistan Horror : Man Burnt Alive – धर्मांध मुसलमानांनी आरोपीला पोलीस ठाण्यात घुसून गोळ्या झाडल्या !
|
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील स्वात जिल्ह्यात एका व्यक्तीने कुराणाचा कथित अवमान केल्यामुळे पोलिसांनी त्याला पकडून पोलीस ठाण्यात नेले होते. या वेळी धर्मांध मुसलमानांच्या जमावाने पोलीस ठाण्यात घुसून या व्यक्तीला गोळ्या झाडून ठार मारले आणि नंतर त्याचा मृतदेह बाहेर आणून जाळला. या वेळी झालेल्या हिंसाचारात ८ जण घायाळ झाले.
Pakistan Horror : Man Burnt Alive for Alleged Blasphemy – Police Station ransacked and torched
📍Swat Khyber Pakhtunkhwa
There have been frequent cases of mob lynchings in Pakistan over alleged Blasphemy in recent years
Such incidents shows that law and order do not exist in… pic.twitter.com/k0KBKzoToP
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 21, 2024
स्वात जिल्हा पोलीस अधिकारी जाहिदुल्ला यांनी सांगितले की, पंजाब प्रांतातील सियालकोट येथील एका व्यक्तीने २० जूनच्या रात्री स्वातच्या मदायन तहसीलमध्ये कुराणची काही पाने जाळल्याची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी संशयिताला कह्यात घेऊन मडायन पोलीस ठाण्यात आणले. यानंतर पोलीस ठाण्याबाहेर जमाव जमला आणि जमावाने संशयिताला त्यांच्या कह्यात देण्याची मागणी केली. पोलिसांनी तसे करण्यास नकार दिल्यावर जमावातील कुणीतरी गोळीबार केला. त्यास पोलिसांनी प्रत्युत्तर दिले. जमाव एवढा मोठा होता की, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे अशक्य होते. त्यानंतर जमावाने पोलीस ठाणे पेटवले. त्यानंतर काही लोकांनी पोलीस ठाण्यात घुसून संशयितावर गोळ्या झाडल्या. व्यक्तीच्या मृत्यूनंतर जमावाने त्याचा मृतदेहही पेटवून दिला. या घटनेमुळे उसळलेल्या हिंसाचारात ८ जण घायाळ झाले.
या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. यात व्यक्तीचा मृतदेह आगीत जळत असून धर्मांध मुसलमानांचा जमाव आजूबाजूला उभा राहून आनंदाने ओरडतांना दिसत आहे.
संपादकीय भूमिका
|