उत्तरप्रदेशमध्ये अटक केलेल्या आरोपीचे मुंबई विमानतळावरून पोलिसांच्या तावडीतून पलायन !
मुंबई – उत्तरप्रदेशमध्ये अटक केलेल्या इमाद वसीम खान (वय ३२ वर्षे) या गुन्हेगाराला गोवा पोलीस घेऊन जात जात होते; मात्र मुंबई विमानतळावर हा आरोपी पोलिसांच्या तावडीतून निसटला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला; मात्र ते त्याला पकडू शकले नाहीत. या प्रकरणी पोलिसांनी त्याच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली आहे.
मुंबई विमानतळावरून २ पोलीस आणि इमाद गोव्याला जाणार्या विमानात बसणार होते; मात्र मुंबई विमानतळावर एक पोलीस कर्मचारी विमातळावरील कर्मचार्याशी विमानतळाविषयी चौकशी करत असतांना इमादने दुसर्या पोलिसाला धक्का देऊन तेथून पलायन केले. (पोलीस कर्मचारी इतके बेसावध कसे ? अशा पोलिसांना बडतर्फच करायला हवे ! – संपादक) तो विमानतळावरून निसटून एका चारचाकीत बसून पळून गेला. इमादच्या विरोधात गोवा येथे काही लोकांना बंदिस्त करणे, मारहाण करणे, तोतया शासकीय अधिकारी बनून लोकांची फसवणूक करणे असे गुन्हे नोंद आहेत.
संपादकीय भूमिका
|