Bhojshala ASI Survey : मध्‍यप्रदेशातील भोजशाळेतील उत्‍खननात सापडली भगवान श्रीकृष्‍णाची मूर्ती

धार (मध्‍यप्रदेश) – इंदूर उच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशानुसार भारतीय पुरातत्‍व सर्वेक्षण विभाग (ए.एस्.आय.) गेल्‍या ३ महिन्‍यांपासून येथील भोजशाळेचे सर्वेक्षण करत आहे. या काळात तंत्रज्ञानाच्‍या साहाय्‍याने २५ फुटांपर्यंतची माती काढून प्राचीन अवशेष आणि मूर्ती काढण्‍यात आल्‍या. २० जून २०२४ या दिवशी म्‍हणजेच सर्वेक्षणाच्‍या ९१ व्‍या दिवशी श्रीकृष्‍णाची दीड फूट उंचीची मूर्ती सापडली.

त्‍यासोबतच इतर २ पुरातन कलाकृतीही सापडल्‍या. एका कलाकृतीवर सनातन धर्माची चिन्‍हे आहेत, तर दुसर्‍या कलाकृतीत उजव्‍या आणि डाव्‍या बाजूला यक्ष कोरलेले आहेत.

संपादकीय भूमिका

भोजशाळा हिंदूंचे मंदिर आणि विद्यापीठ होते, हे येथे आतापर्यंत केलेल्‍या उत्‍खननानंतर स्‍पष्‍ट झाले आहे. आता देशात मुसलमान आक्रमकांनी ज्‍या हिंदूंच्‍या मंदिरांवर आक्रमण करून तेथे मशिदी बांधल्‍या आहेत, त्‍या सर्वांचेच सर्वेक्षण करण्‍याचा एकाच वेळी आदेश देण्‍याची आवश्‍यकता आहे. त्‍यातून सत्‍य इतिहास समोर येईल !